Marathi News> मुंबई
Advertisement

'संजय राऊत केवळ सनसनाटी निर्माण करतायत' देवेंद्र फडणवीस म्हणाले बिनडोक आरोप

आपल्यावर हल्ला करण्याचा कट असल्याचा आरोप करणाऱ्या संजय राऊत यांना देवेंद्र फडणवीस यांनी सुणावलं, संजय राऊत यांना दिला सूचक इशारा

'संजय राऊत केवळ सनसनाटी निर्माण करतायत' देवेंद्र फडणवीस म्हणाले बिनडोक आरोप

Devendra Fadanvis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्यावर हल्ला करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी सुपारी दिल्याचा सनसनाटी आरोप केला आहे. या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात नाव वाद निर्माण झाला आहे. याबरोबरच संजय राऊत आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरही आरोप केले आहेत. मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (DCM Devendra Fadanvis) निवडणुका लढवण्यात, पक्ष फोडण्यात व्यस्त असून लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचं त्यांना काही पडलं नसल्यांच संजय राऊत यांनी म्हटलंय. यावर आता गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. 

देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा आरोप केवळ सनसनाटी निर्माण करण्या करता आहे. सुरक्षेचे विषय राजकारणाशी जोडणं अतिशय चुकीचं आहे, कोणत्याही पुराव्याशिवाय असे आरोप करणं हे त्याही पेक्षा चुकीचं आहे, असं प्रतित्युत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. संजय राऊत असो की कोणीही असो, असुरक्षित वाटत असेल तर ती असुरक्षितता आहे का, त्यांना काही सुरक्षा देण्याची गरज आहे का? ही सर्व कार्यवाही इंटेलिजन्स डिपार्टमेंट करत असतं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे काम करत नाहीत, असं फडणवीस यांनी सांगितलं.

संजय राऊत यांना प्रसिद्धीची सवय
संजय राऊत यांना अलीकडच्या काळात प्रसिद्धीची सवय लागली आहे. विनाकारण रोज कोणतातरी आरोप करायचा, कधी दोन हजार कोटींचा आरोप, कधी हल्ल्याचा आरोप, पण एकही पुरावा त्यांच्याकडे नाही. पूर्वी त्यांच्या आरोपांना आम्ही उत्तर द्यायचो, पण आता इतके बिनडोक आरोप ते करतात, की त्याला काय उत्तर द्यायचं हा प्रश्न पडतो असा टोला फडणवीस यांनी लगावला. त्यामुळे ही जी सनसनाटी ते निर्माण करतायत, याने काहीही फायदा होणार नाही. त्यांना सहानभूती मिळेल असं वाटतंय, तर त्यांना ती मिळणार नाही. रोज खोटं बोलल्याने सहानभूती मिळत नाही. लोकांना हे सर्व लक्षात येतं, असं फडणवीस यांनी म्हटलय. 

चुकीचे आरोप केल्याने उद्या त्यांच्यावर कारवाईची कोणीतरी मागणी करेल, असा सूचक इशाराही फडणवीस यांनी दिला आहे. 

Read More