Marathi News> मुंबई
Advertisement

Election 2024 : 35 टक्के लोकांना मुख्यमंत्रीपदी हवेत देवेंद्र फडणवीस, तर शिंदे आणि उद्धव ठाकरे... पाहा सर्व्हेत कोणाला किती पसंती

विधानसभा निवडणुकीला एका वर्षाचा कालावधी बाकी आहे. पण आतापासून राज्यात निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणूक 2024 मध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार आणि कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री बनणार याचा एका संस्थेने सर्वे केला आहे. 

Election 2024 : 35 टक्के लोकांना मुख्यमंत्रीपदी हवेत देवेंद्र फडणवीस, तर शिंदे आणि उद्धव ठाकरे... पाहा सर्व्हेत कोणाला किती पसंती

Maharashtra Politics : राज्यात 2024 विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या दृष्टीने सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.  2019 ते 2024 या काळात दोन सरकार सत्तेत आले. एक महाविका आघाडी सरकार आणि दुसरं शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis Government). पण आता येत्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2024) कोणाचं सरकार येणार याबाबत एक सर्वे करण्यात आला आहे. न्यूज एरिना इंडिया (News Arena India Survey) या राजकीय संस्थेने एक सर्वेक्षण केलं असून राज्यात 2024 च्या विधानसभा निवडणुकीत कोणतं सरकार सत्ते येणार याचं भाकित वर्तवण्यात आलं आहे. 

भाजप सर्वात मोठा पक्ष
न्यूज एरिना इंडियाने केलेल्या सर्वेत भाजप (BJP) हा सर्वात मोठा राजकीय पक्ष असेल आणि मुख्यमंत्रीही भाजपाचाच असेल असं सांगण्यात आलं आहे. राज्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच सरकार (BJP-Shinde Government) येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलं आहे. भाजप सर्वाधिक म्हणजे 123-129 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचं या सर्वेतून समोर आलं आहे. तर भाजपबरोबर युतीत असलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 25 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय राष्ट्रवादीला 55-56, काँग्रेसला 50-53 तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ 17-19 जागांवर समाधआन मानावं लागेल असा अंदाज या सर्वेतून वर्तवण्यात आलं आहे. महत्वाचं म्हणजे 2024 विधानसभा निवडणुकीत तेलंगणातल्या बीआरएस पक्षाची महाराष्ट्रात एन्ट्री होणार असल्याचं भाकितही वर्तवण्यात आलं आहे. इतर छोट्या पक्षांना 12 जागांवर समाधान मानावं लागेल. 


मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती?
न्यूज एरिना इंडियाने केलेल्या सर्वेनुसार राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना सर्वाधिक पंसती मिळाली आहे. सर्वाधिक 35 टक्के लोकांना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेसे वाटतात. विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना फडवणीस यांच्या खालोखाल म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची पसंती मिळाली आहे. मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना 21 टक्के जनतेने पसंती दिली आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 12 टक्के जनतेची पसंती मिळाली आहे. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना केवळ 9 टक्के जनतेनं मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दर्शवली आहे. 

सर्वाधिक आमदार विदर्भातून
विभागनिहाय विचार केला तर विदर्भातून भाजपाला सर्वाधिक यश मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात भाजपाचे जवळपास 30-31 आमदार निवडून येतील असं भाकित वर्तवण्यात आलं आहे. त्या खालोखाल, खानदेशमध्ये 23, मराठवाडा 19, पश्चिम महाराष्ट्र 22-23, कोकणसहित मुंबईत 29 जागा येतील असा अंदाज या सर्वेत वर्तवण्यात आला आहे. 

एमआयएमला धक्का?
मुस्लीम समाज महाविकास आघाडीकडे वळवल्याने MIM ला मोठा धक्का बसणार अल्याचं या सर्वेत सांगण्यत आलं आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जागांमध्ये किरकोळ वाढ होईल, पण बहुमत गाठता येणार नाही.

Read More