Marathi News> मुंबई
Advertisement

Maharashtra Politcal Crisis : महाराष्ट्रात ठाकरे नावाचं वलय संपलं? एकनाथ शिंदेच्या बंडामुळे मातोश्रीचं महत्त्व कमी?

महाराष्ट्राच्या राजकारणात 'मातोश्री' (Matoshree) बंगला कायम चर्चेत राहिलाय.

Maharashtra Politcal Crisis : महाराष्ट्रात ठाकरे नावाचं वलय संपलं? एकनाथ शिंदेच्या बंडामुळे मातोश्रीचं महत्त्व कमी?

संजय पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्यातील राजकीय सत्ताासंघर्षानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी फेसबूक लाईव्हद्वारे संवाद साधताना पदत्याग केला. यादरम्यान त्यांनी प्रशासनाचे आणि आपल्या सहकाऱ्यांचे आभार मानले. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अखेर कोसळलं. (maharashtra political crisis know about shiv sena party chief uddhav thackeray house matoshree bunglow)

या सर्व सत्तानाट्यात उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजेच मातोश्रीवर अनेक खलबतं झाली. एकनाथ शिंदेच्या बंडाने मातोश्रीची 'पावर कंट्रोल' अशी ओळख संपवली का, असा सवाल उपस्थित झाला. या मातोश्रीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात. 

महाराष्ट्राच्या राजकारणात 'मातोश्री'चं नाव कायम चर्चेत राहिलंय. महाराष्ट्रातील मातोश्री बंगल्याबाबत माहिती नाही, अशी एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही.  ठाकरे घराण्याचा बालेकिल्ला म्हणजेच मातोश्री. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात मातोश्रीचं एक अतिशय महत्त्वाचं अस स्थान होतं. मातोश्री निवासस्थान राजकीय भेटीगाठीचं केंद्रबिंदू राहिलं आहे. आतापर्यंतचे अनेक महत्त्वाचे निर्णय हे मातोश्रीवरुनच घेण्यात आले आहेत.

मातोश्रीकडे ठाकरे घराण्याचे 'सत्ताकेंद्र' म्हणून पाहिलं जातं. राजकीय क्षेत्रातील दिग्गजांव्यतिरिक्त, मायकल जॅक्सनसह, जावेद मियादाद हे आणि यासारखे अनेक दिग्गज आतापर्यंत मातोश्रीवर येऊन गेले आहेत. 
 
मातोश्रीत येण्याआधी ठाकरे  कुटुंबिय हे दादरमधील एका चाळीत राहायचे. मात्र मातोश्रीवर येताच ठाकरे कुटुंबियाचं नशिब पालटलं. बाळासाहेबांकडे अनेक सत्तांचं रिमोट कंट्रोल आलं.

बाळासाहेब हयात असताना महापालिका आणि राज्य सरकारचं नियंत्रण हे मातोश्रीवर असल्याचं राज्याचं राजकारणात म्हटलं जायचं. यावरुनच मातोश्रीचं महत्त्व ठळक होतं. 

मात्र राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेलं वातावरणामुळे मातोश्रीचं वलय संपलं का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. 

मातोश्रीबाबत थोडक्यात

मातोश्रीचं बांधकाम हे 10 स्क्वेअर फूटमध्ये करण्यात आलं आहे. मातोश्री बंगल्याची किंमत जवळपास 80 कोटी रुपये आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मातोश्रीच्या तळमजल्याचा वापर राजकीय आणि सामाजिक कामांसाठी करायचे. तर पहिला मजला बाळासाहेब ठाकरे यांची कन्या स्मिताची मुलगी ऐश्वर्या हिच्या नावावर आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचे कुटुंब दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर राहतात. 

पुढची भूमिका काय?

मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी आपली पुढील रणनिती स्पष्ट केली आहे. आता पुढे मी  शिवसेना भवनावर जनतेच्या सेवेसाठी उपस्थित असणार आहेत. शिवसेनेची जबाबदारी सांभाळणार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. 

Read More