Marathi News> मुंबई
Advertisement

Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ

राज्यासह मुंबईत कोरोना हळुहळु डोकं वर काढतोय. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांची आकडेवारी पाहिली तर कोरोना रुग्णांच्या आकड्यात  (Maharashtra Corona Update) वाढ होत असल्याचं दिसून येतंय.

Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ

मुंबई : कोरोनाचा जोर ओसरल्याने राज्यात सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले.  मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यासह मुंबईत कोरोना हळुहळु डोकं वर काढतोय. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांची आकडेवारी पाहिली तर कोरोना रुग्णांच्या आकड्यात  (Maharashtra Corona Update) वाढ होत असल्याचं दिसून येतंय. चिंताजनक बाब म्हणजे मुंबईतही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकड्यात वाढ झाली आहे. (maharashtra corona update 31 may 2022 today 711 corona patients found in state)

दिवसभरात राज्यामध्ये एकूण 700 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. धक्कादायक बाब अशी की या 700 पैकी 500 रुग्ण हे फक्त मुंबईतील आहेत. 

राज्यात आज (31 मे) 711 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 366 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तसेच दुर्देवाने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत 506 जणांना कोरोनाची बाध झाली आहे. 

राज्यात सक्रीय रुग्ण किती?

राज्यात आजमितीस एकूण 3 हजार 475 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या 3475 पॉझिटिव्ह पैकी 2 हजार 526 जण हे मुंबईमधील आहेत.

मास्क वापरण्याचं आवाहन 

दरम्यान कोरोनाचा जोर ओसरला असला तरी तो पूर्ण पणे गेलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर करावा असं आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. 

Read More