Marathi News> मुंबई
Advertisement

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र, राजकीय वर्तुळात चर्चा

Maharashtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे एका कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आले होते. त्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. 

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र, राजकीय वर्तुळात चर्चा

Maharashtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एका कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आले होते. त्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भगिनी जय जयवंती देशपांडे यांच्या मुलाचा साखरपुडा कार्यक्रमा आज सकाळी 11 वाजता दादर हिंदू कॉलनी इथल्या एका सभागृहात पार पडला. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते... मात्र प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये कुठलाही संवाद झाला नाही. या कार्यक्रमासाठी रश्मी ठाकरे ही उपस्थित होत्या.

ठाकरे गटाचा लोकसभा सीट फॉर्म्युला
लोकसभेच्या जागा वाटपावरून मविआत मतभेद होण्याची शक्यताय... आम्ही लोकसभेच्या 23 जागा लढवणार असून, याबाबत दिल्लीत काँग्रेस नेत्यांशी तशी चर्चा झाल्याचं राऊतांनी म्हटलंय...जागावाटपाबाबत दिल्लीतच चर्चा होईल असं ठामपणे राऊतांनी सांगितलंय... मात्र, राऊतांच्या दाव्याचं खंडन करणार नसून, आमचा निर्णय हायकमांड घेईल अशी सावध प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिलीय. 

इंडिया आघाडीच्या दिल्लीतल्या बैठकीनंतर जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला जाणार आहे. पण त्याआधीच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबतची चर्चा जवळपास पूर्ण झाली आहे. लवकरच जागावाटपाचे आकडे समोर येतील असं संजय राऊत यांनी म्हटलंय. शिवेसना महाराष्ट्रात दरवेळी 23 जागांवर निवडणूक लढवते. आणि यावेळी देखील 23 जागांची मागणी केल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. 

इंडिया आघाडीच्या बैठकीआधी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशीही आमची चर्चा झाल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील लोकसभा जागावाटपात सविस्तर चर्चा झाल्याचं राऊत यांनी म्हटलंय.

दिल्लीत जागा वाटपाचा निर्णय
काँग्रेसनेही काहीही वक्तव्या केली तरी महाराष्ट्रातील जागावाटपाबाबतचा निर्णय दिल्लीत घेतला जाईल असं संजय राऊत यांनी सांगितलं. महाराष्ट्रात 2019 साली भाजप-शिवसेना युतीने निवडणूक लढवली होती. यात भाजपने 25 तर शिवसेनेने 23 जागांवर निवडणूक लढवली. भाजप 25 पैकी 23 जागांवर तर शिवसेना 23 पैकी 18 जागांवर विजयी झाले होते.

Read More