Marathi News> मुंबई
Advertisement

L&T Recruitment : महिलांना देणार नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

महाराष्ट्रातील ब्रेक घेतलेल्या महिलांसाठी मोठी बातमी 

L&T Recruitment : महिलांना देणार नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : Larsen & Toubro Renew: नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिला प्रोफेशन्लसकरता आनंदाची आणि महत्वाची बातमी. इंजिनिअरिंग फर्म लार्सन ऍण्ड टुब्रो (Larsen & Tubro) मध्ये महिला उमेदवारांना नोकरीची खास संधी उपलब्ध झाली आहे. महत्वाच म्हणजे ज्या महिलांना काही कारणास्तव आपल्या करिअरमधून ब्रेक घ्यावा लागला अशा महिलांना L&T संधी देणार आहे. या महिला ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या करिअरला सुरूवात करू शकतात. आणि अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करू शकतात. 

कंपनीने याकरता 'Renew' प्रोग्रामची घोषणा केली आहे. L&T ने सांगितलं की, रिन्यू मध्ये कंपनी विविध विभागात आणि समान करिअर करण्याची सुवर्णसंधी देणार आहे. यामुळे महिलांचा आत्मविश्वास द्विगुणित होणार आहे. Renew प्रोग्राम सुरू करण्यामागचा महत्वाचा उद्देश आहे. काही कारणास्तव ज्या महिलांनी करिअरमध्ये ब्रेक घेतला आहे. त्या महिलांना पुन्हा एकदा संधी द्यायची. मोठ्या ब्रेकनंतरही या महिला कॉर्पोरेट क्षेत्रात प्रगती करू शकतात. 

कोण अप्लाय करू शकतं?

L&T ने सांगितले की, कोणतीही महिला व्यावसायिक जी तिच्या करिअरमध्ये ब्रेकवर आहे, त्यासाठी अर्ज करू शकते. त्यासाठी खालील पात्रता मागविण्यात आली आहे. यामध्ये उमेदवाराने BE/BTech/MBA/LLB (प्रथम श्रेणी) किंवा CA, ICWA (जास्तीत जास्त दोन प्रयत्नांमध्ये यशस्वी) असणे आवश्यक आहे.

कोणत्या क्षेत्रात मिळणार नोकरीची संधी?

L&T ने सांगितले की, नूतनीकरण कार्यक्रमांतर्गत, उमेदवारांना लेखापरीक्षण (Audit), वित्त/लेखा, अभियांत्रिकी-डिझाइन (Engineering- Design), प्रकल्प व्यवस्थापन (Project Management), IT, HR, कायदेशीर आणि CSR या क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळू शकतात.

कसं होणार सिलेक्शन?

कंपनीने सांगितले की या नोकऱ्यांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल आणि एक बायोडाटा मेल करावा लागेल. हा बायोडाटा संबंधित विभागाकडे पाठवला जाईल, जिथे त्याची तपासणी केली जाईल. परीक्षेत पात्र आढळल्यास, टेलिफोनिक मुलाखत आणि नंतर उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत होईल. पात्र आढळल्यासच उमेदवाराला नोकरीवर नियुक्त केले जाईल.

Read More