Marathi News> मुंबई
Advertisement

लाईफलाईन की मृत्यूचा सापळा? लोकलमधून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास, Photo Viral

मुंबईकर जीव मुठीत धरुन करतायेत प्रवास.... Viral Photo  पाहून व्हाल थक्क  

लाईफलाईन की मृत्यूचा सापळा? लोकलमधून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास, Photo Viral

मुंबई : 'लवकर खाली उतरा... आत चला लवकर...' असे सूर तुम्हाला रोज ऐकू येतील जर तुम्ही लोकलने प्रवास करत असाल तर, कारण मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल ट्रेनने अनेक प्रवासी प्रवास करतात. पण जर सकाळ आणि सायंकाळची वेळ असेल तर चाकारमाण्यांची तोबा गर्दी रेल्वे स्थानकावर दिसून येते. अशात जर सकाळी कामावर जाताना रोजची ट्रेन चुकली तर ऑफिसात जायला उशीर होणार या भीतीने मुंबईकर लोलकच्या मागे जीव मुठीत धरुन धावतो आणि लोलकमध्ये ठरतो. 

लोकलमध्ये प्रचंड गर्दी दिसत आहे. वेळेत ऑफिसला जाणाच्या गडबडीत प्रत्येक जण ठरलेली लोकल पकडण्याचा घाईत असतो. असे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यापैकी एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

fallbacks

महत्त्वाचं म्हणजे मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सर्वसामान्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे.  लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे आणि गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये चढणं-उतरणं फार कठीण आहे, पण लोकल मुंबईकरांच्या रोजच्या जीवनातील गोष्ट आहे. पण मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असलेली लोकल मृत्यूचा सापळा बनत आहे. त्यामुळे प्रवास करताना स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे. 

 

 

Read More