Marathi News> मुंबई
Advertisement

विरोधकांचा आक्षेप सुरेश भटांना? - इनामदार

मराठी अभिमान गीताबाबत झालेल्या गोंधळावर या गीताचे संगीतकार कौशल इनामदार यांनीही प्रतिक्रिया दिलीय.

विरोधकांचा आक्षेप सुरेश भटांना? - इनामदार

मुंबई : मराठी अभिमान गीताबाबत झालेल्या गोंधळावर या गीताचे संगीतकार कौशल इनामदार यांनीही प्रतिक्रिया दिलीय.

मूळ सुरेश भटांच्या कवितेत 'पाहुणे जरी असंख्य पोसते...' या ओळी नाहीत. १९६८ ला 'रुपगंध'मध्ये फक्त सहा कडवी आहेत... असं कौशल इनामदारांनी म्हटलंय. 

'रुपगंधा'ची शेवटच्या आवृत्तीतदेखील या ओळी नाहीत. आम्ही सुरेश भटांना मानतो, त्यांनी जे लिहिलं तेच आम्ही गायलं... ज्यांनी या विषयावरून गदारोळ घातला त्यांनी ठरवावं की त्यांचा विरोध नक्की कुणाला आहे? असं कौशल इनामदार यांनी म्हटलंय. 

आज साउंड सिस्टीम बंद पडली तरी विद्यार्थी गात होते, आमदार गात होते. विद्यार्थ्यांना कविता पाठ होती ही आपली पुढची पीढी आहे त्यांच कौतुक आहे. असंही इनामदार यांनी म्हटलंय. 

Read More