Marathi News> मुंबई
Advertisement

कमला मिल दुर्घटनेनंतर कुर्ल्यातील सिटी किनारा हॉटेल अग्निकांडाची आठवण ताजी

कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा बळी गेल्यानंतर, कुर्ला इथल्या अग्निकांडाची आठवण ताजी झालीय.

कमला मिल दुर्घटनेनंतर कुर्ल्यातील सिटी किनारा हॉटेल अग्निकांडाची आठवण ताजी

मुंबई : कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा बळी गेल्यानंतर, कुर्ला इथल्या अग्निकांडाची आठवण ताजी झालीय.

२०१५ साली कुर्ल्याच्या सिटी किनारा हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत ८ जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. 

या घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी मृतांच्या नातेवाईकांना मोठा लढा दिला. यात दोन पालिका अधिका-यांवर कारवाई लागली. पण त्यासाठी तब्बल २ वर्षं लागली. 

त्यावेळी मृतांच्या नातेवाईकांना दिलेल्या अनेक आश्वासनांची अद्याप पूर्तता झालेली नाही. साकीनाक्याच्या फरसाण मार्टमध्ये लागलेल्या आगीनंतर कुणावरही अजून कारवाई झालेली नाही.

त्यामुळं आगीच्या ताज्या घटनेनंतरही कुणावरही कारवाई होणार नाही, अशी खंत सिटी किनाराच्या आगीत आपला मुलगा गमावणा-या मुश्ताक शेख यांनी व्यक्त केलीय.

याआधी लागलेल्या आगीतून आपण काय शिकलो?

Read More