Marathi News> मुंबई
Advertisement

कमला मिल दुर्घटना : या व्यक्तीने वाचविले १०० जणांचे प्राण

यामध्ये असा एका 'मसिहा' होता, ज्याने १०० जणांचे प्राण वाचविले. 

कमला मिल दुर्घटना : या व्यक्तीने वाचविले १०० जणांचे प्राण

मुंबई : मुंबईच्या लोअर परेल भागातील कमला मिल कम्पाऊंडमध्ये गुरूवारी रात्री उशीरा आग लागल्याने १४ जण ठार झाले. यामध्ये ५५ जण गंभीर जखमी झाले.

मरणाऱ्यांमध्ये ११ महिला तर ३ पुरूषांचा समावेश होता.  दुर्घटना घडत असताना हॉटेलचा मॅनेजर आणि स्टाफ लोकांना वाचविण्याऐवजी पळून गेले. पण यामध्ये असा एका 'मसिहा' होता, ज्याने १०० जणांचे प्राण वाचविले. 

सिक्यूरीटी गार्ड 

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, महेश साबळे हे कमला मिल कम्पाऊंडमध्ये सिक्यूरीटी गार्डची नोकरी करतात.   हे साधारण १०० जणांसाठी 'देवदूत' म्हणून आले होते. 
  
या कम्पाऊंडमध्ये मोजोस, वन अबव आणि लंडन टॅक्सी नावाचे ३ हॉटेल्स आहेत.  मोजोस पब येथे आग लागली.

जखमींमच्या मते, मोजोसमध्ये प्लायवूड आणि प्लास्टिकचे इंटेरिअर होते. त्यामूळे आग वेगाने पसरत गेले. 

१०० जणांना वाचविले 

 जेव्हा आग लागली तेव्हा महेश हॉटेलच्या वरच्या भागात होते. त्यांनी लोकांना बाहेर जाण्यास मदत केली. त्यांनी साधारण १०० जणांना अशा पद्धतीने बाहेर काढले.

या सत्कार्याला त्यांच्या मित्रांनीही त्यांना मदत केली.

Read More