Marathi News> मुंबई
Advertisement

कमला मिल आगप्रकरणी १२ जणांवर २७०० पानी आरोपपत्र दाखल

कमला मिल आगप्रकरणी भोईवाडा न्यायालयात अटक करण्यात आलेल्या १२ जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. 

कमला मिल आगप्रकरणी १२ जणांवर २७०० पानी आरोपपत्र दाखल

मुंबई : कमला मिल आगप्रकरणी भोईवाडा न्यायालयात अटक करण्यात आलेल्या १२ जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. मोजो बिस्ट्रो, वन अबवमधील हॉटेल संचालक, वेटर, कमला मिल कंपाऊंडचा मालक आणि संचालक अशा १२ जणांविरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं. 

कमला मिल कंपाऊंडमधील आग दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी आज भोईवाडा कोर्टात आरोपपत्र दाखल केले. हे आरोपपत्र २ हजार ७०० पानी असल्याचे सांगण्यात आले. कमला मिल कंपाऊंडमधील वन अबव्ह आणि मोजो बिस्ट्रो या रेस्टोपबना २९ डिसेंबरच्या रात्री लागलेल्या भीषण आगीत १४ निष्पाप लोकांचा बळी गेला होता. 

या दुर्घटनेप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून १२ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात वन अबव्ह रेस्टोपबचे तीन मालक कृपेश सिंघवी, जिगर सिंघवी, अभिजीत मानकर, मोजोस बिस्टोचा मालक युग पाठक, कमला मिलचा मालक रमेश गोवानी, सहमालक रवी भंडारी, स्थानिक अग्निशमन केंद्राचे अधिकारी राजेंद्र पाटील, हुक्का पुरवठादार उत्कर्ष विनोद यांचा समावेश होता. आज पोलिसांनी एकूण १२ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.

Read More