Marathi News> मुंबई
Advertisement

कमला मिलमधील 14 बळी आगीच्या खेळामुळे

आगीच्या खेळामुळे ही आग लागली आणि हुक्क्याच्या निखाऱ्यामुळे अधिक भडकल्याचं सांगण्यात येत आहे.

कमला मिलमधील 14 बळी आगीच्या खेळामुळे

मुंबई : कमला मिलमधील मोजो आणि वन अबव्ह या रेस्टोपब्सना लागलेली आग, ही आगीच्या खेळामुळे लागली असल्याचा अहवाल मुंबई अग्निशमन दलाने दिला आहे.

आगाची खेळ आणि हुक्क्याचा निखारा

आगीच्या खेळामुळे ही आग लागली आणि हुक्क्याच्या निखाऱ्यामुळे अधिक भडकल्याचं सांगण्यात येत आहे.

निष्काळजीपणाचे 14 बळी

मोजो पबमध्ये सुरू असलेल्या आगीच्या खेळामुळे ही भीषण आग लागल्याचा हा अहवाल आहे. 30 डिसेंबर 2017 रोजी लागलेल्या या आगीत 14 जणांचा बळी गेला होता.

मोजोतील अग्निशमन यंत्रणेत त्रुटी असल्याचंही अग्निशमन दलाने आपल्या अहवालात म्हटलं आहे.

Read More