Marathi News> मुंबई
Advertisement

चालती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न फसला; थरारक प्रसंगी RPF जवानामुळे वाचले प्राण

मुंबईत नेहमीच चालत्या ट्रेनदरम्यान होणारे अपघात घडत असतात. असाच एक प्रकार कल्याण रेल्वे स्थानकावर पाहायला मिळाला आहे

चालती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न फसला; थरारक प्रसंगी RPF जवानामुळे वाचले प्राण

कल्याण : मुंबईत नेहमीच चालत्या ट्रेनदरम्यान होणारे अपघात घडत असतात. असाच एक प्रकार कल्याण रेल्वे स्थानकावर पाहायला मिळाला आहे. 11 मे रोजी एक महिला चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात खाली पडली. ती प्लॅटफॉर्मवर पडताच तिथे उपस्थित असलेल्या RPF जवानाने महिलेला तत्काळ उचलले. ही घटना सीसीटीव्ह कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळे RPF जवानाचे कौतुक होत आहे. 

कल्याण RPF विभागाच्या मते महिला लोकमान्य टिळक टर्मिनस - विशाखापट्टनम ट्रेनमध्ये चढण्यासाठी धावत होती. तिच्याकडे जड ओझेदेखील होते. चढण्याच्या प्रयत्नात तिचा तोल गेला आणि ती महिला खाली पडली. जशी ती खाली पडली. जवळच असलेल्या RPF जवानाने तिला उचलले. त्यामुळे महिलेचे प्राण वाचले. 

प्लॅटफॉर्मच्या गॅपमुळे अपघात

महिला ज्या जागी पडली त्या ठिकाणी ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये गॅप होता. ती महिला पडून ट्रॅकपर्यंत पोहचणार त्याआधीच जवानाने मोठ्या धाडसाने त्या महिलेला वाचवले. ही संपूर्ण घटना प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Read More