Marathi News> मुंबई
Advertisement

कल्याण स्थानकात धावत्या एक्सप्रेसमधून उतरण्याचा थरार, 2 प्रवाशांसोबत पुढे काय घडलं? जाणून घ्या

Kalyan railway Station Accident: कल्याण स्थानकात डेक्कन क्वीन एक्सप्रेसमधून दोन प्रवासी पडल्याची घटना घडलीय. यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. 

कल्याण स्थानकात धावत्या एक्सप्रेसमधून उतरण्याचा थरार, 2 प्रवाशांसोबत पुढे काय घडलं?  जाणून घ्या

Kalyan railway Station Accident: चालत्या ट्रेनमध्ये चढू अथवा उतरु नका, फलाटावरील अंतरावर लक्ष द्या अशा सूचना वारंवार दिल्या जातात. पण प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे अनेक दुर्घटना समोर येत असतात. अशीच एक घटना कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर 7 वर सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. 

कल्याण स्थानकात डेक्कन क्वीन एक्सप्रेसमधून दोन प्रवासी पडल्याची घटना घडलीय. यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. डेक्कन एक्सप्रेस पुण्याहुन मुंबईच्या दिशेने जात होती, कल्याण स्थानकात या एक्सप्रेसला हॉल्ट नाही. मात्र कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर 7 वरून ही एक्सप्रेस जात असताना तिची गती कमी झाली. त्यामुळे रियाद अली आणि त्याचा नातेवाईक धावत्या एक्सप्रेसमधून प्लॅटफॉर्मवर उतरण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचा हा प्रयत्न फसला आणि ते दोघे खाली पडले. 

या घटनेत फरीद अन्सारीचा मृत्यू झाला. तर रियादच्या डोक्याला मार लागला आहे. या अपघाताची माहिती रेल्वे पोलीस,रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांना कळविण्यात आली. यानंतर त्यांनी तात्काळ रेल्वे हमालांना बोलवून पुढील कार्यवाही सुरु केली. अपघातग्रस्त दोघांना कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

या दोन प्रवाशांना नेरळला जायचे होते. त्यामुळे कल्याण स्थानकात उतरून जात येईल असे त्यांना वाटल्याने त्यांनी एक्सप्रेसमधून उतरण्याचा निर्णय घेतला.

महिला प्रवाशांसाठी रेल्वेने केली महत्त्वाची घोषणा

मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस लोकलला तुडुंब गर्दी असते. अनेकदा तर सकाळी ऑफिसच्या वेळेत ट्रेनमध्ये चढायलाही जागा उरत नाही आणि जरी जागा मिळाली तरी गर्दीत कसे तरी उभे राहायला मिळते. अशातच एखाद्या मिटिंगसाठी किंवा ऑफिसमध्ये जायचे असल्यास त्याच अवतारात जावे लागते. महिलांना अशावेळी खूप अडचणी निर्माण होतात. त्यामुळं रेल्वे प्रशासनाने महिला प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. 

महिलांच्या सुविधांसाठी मध्य रेल्वेने 7 स्थानकांवर महिला पावडर रुम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या रुममध्ये महिला मेकअप किंवा तयार होण्याव्यतिरिक्त मेकअपसंबंधी सामानही खरेदी करु शकणार आहेत. महिलांसाठी शौचालय, वॉशबेसिन, आरसा, ड्रेसिंग टेबलसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. फक्त 10 रुपयांत महिलांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. रेल्वेने महिलांसाठी संपूर्ण वर्षभराचा प्लानही तयार केला आहे. 365 रुपये भरुन संपूर्ण वर्षभर रुमचे सब्स्क्रिप्शन खरेदी करु शकतात. सध्या ही सुविधा लोकमान्य टिळक टर्मिनन्स, घाटकोपर, मुलुंड, ठाणे,मानखुर्द आणि चेंबूर स्थानकात उपलब्ध आहे. 

Read More