Marathi News> मुंबई
Advertisement

जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद आज मुंबईत

छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय छात्र संमेलनाला जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद हे दोघे आज मुंबईत हजेरी लावणार आहेत. 

जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद आज मुंबईत

मुंबई : छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय छात्र संमेलनाला जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद हे दोघे आज मुंबईत हजेरी लावणार आहेत. 

विलेपार्ले येथील भाईदास सभागृहात गुरुवारी सकाळी ११ पासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हे संमेलन पार पडणार असून विद्यार्थी नेत्या रिचा सिंग, प्रदीप नरवाल, बेदाब्रता गोगई आणि छात्रभारतीचे अध्यक्ष दत्ता ढगे हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. 

भीमा कोरेगाव प्रकरण आणि महाराष्ट्र बंद नंतर जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद काय बोलणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Read More