Marathi News> मुंबई
Advertisement

जे जे रूग्णालयाच्या गेटसमोर प्रचंड अस्वच्छता, मुंबई महापालिका स्वच्छतेचं ब्रीद विसरली?

जे जे रूग्णालयाच्या ओपीडी गेटसमोर बाहेरील बाजूस प्रचंड अस्वच्छता आहे. येथे रस्त्यालगत घाण पाणी वाहत गेटसमोर येत आहे. 

जे जे रूग्णालयाच्या गेटसमोर प्रचंड अस्वच्छता, मुंबई महापालिका स्वच्छतेचं ब्रीद विसरली?

मुंबई : जे जे रूग्णालयाच्या ओपीडी गेटसमोर बाहेरील बाजूस प्रचंड अस्वच्छता आहे. येथे रस्त्यालगत घाण पाणी वाहत गेटसमोर येत आहे. वाहनांच्या चाकाला देखील हा चिखल लागून आत येतोय, तर येणाऱ्या जाणाऱ्यांना यातून चालत वाट काढावी लागत आहे. महापालिकेचं गाडीत कचरा भरण्याचं काम जवळच केलं जात. तिथलं तसेच फूटपाथवर राहणाऱ्या रहिवाशांकडून हे पाणी वाहत या गेटवर येत असल्याचं दिसतंय. या गेटवर गेटनंबर ६ असं लिहिलंय.

जे जे रूग्णालायत उपचारासाठी रूग्ण येत असतात. पण महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे येथे चिखल जमा होत असल्याने, रोगाचं साम्राज्य पसरण्याची शक्यता वाढली आहे. विशेष म्हणजे या गेटवरून मोठ्या प्रमाणात रूग्णांचा वावर आहे, तरी देखील याकडे मुंबई महापालिका दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे.

संबंधित वॉर्ड ऑफिसर आणि आरोग्य विभागाच्या लक्षात ही बाब येत नाही का हा देखील प्रश्न येथे उपस्थित होत आहे. तसेच जे जे रूग्णालय़ाच्या प्रशासनाने ही बाब महापालिकेला लक्षात आणून देण्याची गरज आहे. 

जे जे रूग्णालयाच्या कपांऊंटला अतिक्रमणाचा विळखा पडलेला दिसून येतो, पण यामुळे आरोग्यावर परिणाम होणार असेल, तर याला महापालिका आणि संबंधित यंत्रणाच जबाबदार असेल.

Read More