Marathi News> मुंबई
Advertisement

Isha Ambani Anand Piramal : अंबांनी आजोबांच्या नातवंडांसाठी शाही थाट; पाहा स्वागताचा नेत्रदीपक सोहळा

Isha Ambani Anand Piramal : कोण वाटणार 300 किलो सोनं, तर बाळांना कोवळं ऊन मिळावं यासाठी कुणी केली खास सोय... पाहा शब्दाशब्दावर थक्क करणारी बातमी 

Isha Ambani Anand Piramal : अंबांनी आजोबांच्या नातवंडांसाठी शाही थाट; पाहा स्वागताचा नेत्रदीपक सोहळा

Isha Ambani Anand Piramal : देशातील श्रीमंतांच्या यादीत अग्रस्थानी असणाऱ्या आणि भारतीय उद्योग जगतामध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. निमित्तही अगदी खास आहे, कारण अंबानींची लेक म्हणजेच ईशा अंबानी तिच्या दोन्ही तान्हुल्यांना घेऊन इतक्या दिवसांनी मायदेशी, स्वगृही परतणार आहे. 

ला़डाची लेक आणि पिरामल कुटुंबाची लाडकी सून ईशा (Isha Ambani) दोन नव्या सदस्यांसह घरी परतत असल्यामुळं त्यासाठी खास व्यवस्थाही करण्यात आली आहे. म्हणजे ईशाचा परदेशातून प्रवास सुरु होण्याच्या क्षणापासून ते अगदी ती इथं घरात पाऊल ठेवेपर्यंत प्रत्येक क्षण हा खास होता. इतकंच नव्हे तर, घरी पोहोचल्यानंतरही अद्वितीय अशा सोहळ्यापासून तिच्या बाळांच्या स्वत:च्या घरातील जीवनाची सुरुवात होणार आहे. 

 

देशातील मोठमोठ्या मंदिरांचे पुजारी देणार आशीर्वाद

देशभरातील विविध मंदिरांचे पुजारी, गुरुजी ईशा अंबानी आणि तिच्या नवजात बालकांना आशीर्वाद देण्यासाठी करुणा सिंधू या त्यांच्या निवासस्थानी येणार आहेत. इथंच अंबानी आणि पिरामल या दोन्ही कुटुंबांनी बाळांच्या स्वागतासाठी काही धार्मिक विधींचंही आही आयोजन केलं आहे. या शुभप्रसंगी अंबानी कुटुंबाकडून तब्बल 300 किलो सोनं दान करण्यात येणार आहे. 

खास पदार्थ वाढवणार सोहळ्याची रंगत... 

या खास क्षणाची रंगत आणखी वाढवण्याचं काम इथले आचारीही करणार आहेत. जगभरातून प्रख्यात आचारी, शेफ यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. शिवाय बालाजी मंदिर तिरुमला (Tirumala tirupati), नाथद्वाराचं श्रीनाथजी मंदिर (Srinathji), श्री द्वारकाधीश मंदिर (Shree dwarkadhish) आणि इतरही मंदिरांचा प्रसाद इशं सर्वांना वाटण्यात येणार आहे. 

मुकेश अंबानींच्या खास मित्रानं पाठवलं विमान... 

ईशा आणि तिची मुलं कतारच्या खास विमानानं आले. हे विमान Emir of Qatar यांनी पाठवलं. ते मुकेश अंबानी यांचे खास मित्र असल्याचंही सांगण्यात येतं. या प्रवासादरम्यान मुंबईहून गेलेले प्रशिक्षित डॉक्टरही ईशासोबत होते.

हेसुद्धा वाचा : सर्वसामान्य महिलेसोबत घडणारा 'हा' प्रकार नीता अंबानींसोबतही घडलाय, तुमचा विश्वासच बसणार नाही

दोन्ही बाळांसाठी अँटीलिया आणि करुणा सिंधू या निवासस्थानांवर अशी व्यवस्था करण्यात आली आहे, जिथं चिमुकल्यांपर्यंत कोवळी सूर्यकिरणं सहजपणे पोहोचू शकतील. ईशा आणि तिच्या बाळांसाठी लोरो पिआना, हर्मिस आणि डिऑर या जगविख्याक ब्रँडचं फर्निचर बनवून घेण्यात आलं आहे. लहानग्यांसाठी डोल्चे गबाना (Dolce & Gabbana), गुची (Gucci) आणि लोरो पिआना (Loro Piana) या ब्रँडचे कपडे निवडण्यात आले आहेत. इतकंच नव्हे, तर त्यांना कारमधून नेण्यासाठी बीएमडब्ल्यूनं डिझाईन केलेल्या खास सीट्सही वापरण्यात येणार आहेत. 

ईशा अंबानीच्या बाळांची निगा राखण्यासाठी अमेरिकेहून 8 नॅनी भारतात आल्या आहेत. काही खास परिचारिकाही यावेळी ईशाच्या सेवेच असतील. थोडक्यात नातवंडांसाठी अंबानी आणि पिरामल कुटुंबीयांनी राजेशाही थाटच उभा केला आहे असं म्हणायला हरकत नाही. 

Read More