Marathi News> मुंबई
Advertisement

इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांनी ईडीला चौकशीबाबत असे कळवले

 चौकशीसाठी हजर होऊ शकत नसल्याचे इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांनी ईडीला कळवले आहे. 

इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांनी ईडीला चौकशीबाबत असे कळवले

मुंबई : परदेशात असल्याने चौकशीसाठी हजर होऊ शकत नसल्याचे इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांनी ईडीला कळवले आहे. वरळीमधील प्रॉपर्टीबाबत ईडीने इक्बालच्या कुटुंबीयांना समन्स पाठवला आहे. याबाबत इक्बालच्या कुटुबीयांनी ईमेलद्वारे आमचे कुटुंब हजर राहू शकत नसल्याचे ईडीला कळवले आहे. याप्रकरणी ईडीने इक्बाल मिर्चीची पत्नी हजरा मेमन, जुनैद आणि आसिफ या दोन मुलांना समन्स पाठवला आहे. इक्बाल मिर्चीच्या दोन साथीदारांविरोधात वरळीतील एका प्रॉपर्टीबाबत गुन्हा दाखल असून यामध्ये दहशतवादांच्या समावेशाबाबत आरोप लावण्यात आले आहेत. याप्रकरणीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पवार यांच्या कंपनीने बांधलेल्या सीजे हाऊस प्रॉपर्टीचं प्रकरणदेखील समाविष्ट आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक इक्बाल मिर्ची यांचे कुटुंब अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) हजर नव्हते. ईडीने मिर्चीची पत्नी हजरा मेमन, तिची दोन मुले - जुनैद आणि आसिफ यांना समन्स पाठविले आहे. या समन्सला उत्तर देताना मिर्चीच्या कुटुंबीयांनी ईडीला ई-मेल पाठविला असल्याचे सांगण्यात येत आहे. इक्बाल मिर्चीच्या दोन गुंडांविरूद्ध वरळी येथील मालमत्तेबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात दहशतवाद्यांना पैसे दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ईडीने मिर्ची कुटुंबीयांना चौकशीसाठी समन्स पाठविले आहे, असे वृत्त 'आज तक'ने दिले आहे. इक्बाल मिर्ची कुटुंबीयांनी ईडीला सांगितले की, भारताबाहेर आहोत, त्यामुळे चौकशीसाठी येऊ शकत नाही. 

इक्बाल मिर्चीशी संबंधांप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हे आज ईडी समोर हजर झाले आहेत. हजरा मेननशी केलेल्या मालमत्ता खरेदी विक्री व्यवहारांचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हजरा मेनन इक्बाल मिर्चीची पत्नी असून इक्बाल मिर्ची हा दाऊदचा जवळचा हस्तक आहे. दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांची ईडीने तब्बल  १२ तास चौकशी केली.

Read More