Marathi News> मुंबई
Advertisement

दाऊदचा साथीदार फारूख टकला जेरबंद, १९९३ पासून होता फरार

१९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार फारुख टकलाला दुबईत अटक करण्यात आली. 

दाऊदचा साथीदार फारूख टकला जेरबंद, १९९३ पासून होता फरार

मुंबई : १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार फारुख टकलाला दुबईत अटक करण्यात आली. 

फारूख टकला जेरबंद

फारुख टकलाला आज सकाळी सीबीआयच्या टीमनं त्याला मुंबईत आणलं. १९९३ बॉम्बस्फोटानंतर १९९५ मध्ये फारूखविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. १९९३ मुंबई बॉम्बस्फोटानंतर फारूख टकलानं भारतातून पळ काढला होता. आज त्याला टाडा कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.

‘दाऊदला भारतात यायचंय’

दरम्यान, मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भारतात परण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलंय. दाऊदचे वकील श्याम केसवाणी यांनी दाऊद भारतात येण्यास तयार असल्याचं संगितलंय. कितीही खटले चालवा मात्र आपल्याला मुंबईतल्या आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात यावं अशी दाऊदची मागणी असल्याचंही केसवाणींनी जेठमलानींचा हवाला देऊन सांगितलं.

निकमांनी केली टीका

तर काही राजकारण्यांचं बिंग फुटणार असल्यामुळेच दाऊदला भारतात येऊ देण्यास अडथळे निर्माण करत असल्याचा आरोपही केसवाणींनी केलाय. तर दाऊद शरणागती पत्करणार असल्याचं केसवाणींचं वक्तव्य खोडसाळपणाचं असल्याची टीका विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलीय. 

Read More