Marathi News> मुंबई
Advertisement

अजबच! जुळ्या भावांचे १२ वी परिक्षेत गुणही जुळले

हे दोन्ही भाऊ एकाच वर्गात शिकतात आणि एकाच घरात एकत्र अभ्यास करतात.

अजबच! जुळ्या भावांचे १२ वी परिक्षेत गुणही जुळले

नवी दिल्ली: आपण अनेकदा पाहिले असेल जुळी भावंड ही दिसायला काहीशी सारखीच असतात. थोड्याफार फरकाने त्यांच्या सवयी आणि इतर गोष्टीही सारख्याच असतात. जुळ्या भावंडांवरती आपण अनेक सिनेमेही पाहिले असतील. पण, या सगळ्यापेक्षा काहीशी वेगळी घटना मुंबईत घडली आहे. मुंबईत राहणाऱ्य़ा रोहन आणि राहुल चेम्बाकसेरिल  या जुळ्या भावंडांनी आयसीएसई बोर्डाची इयत्ता १२वीची परिक्षा दिली. विशेष असे की, या भावंडांना परिक्षेत मिळालेले मार्क्सही जुळे आहेत. म्हणजे दोघांना ही बरोबर ९६.०५ टक्केच मार्क्स मिळाले आहेत. हा योगायोग असला तरी, या प्रकाराची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

..त्यांना करायचंय विज्ञान शाखेतून करिअर

रोहन आणि राहुल ये मुंबईतील खार परिसरातील जशोदाबेन एमएल स्कूलचे विद्यार्थी आहेत. इतके मार्क्स तेही सारखेच मिळाल्याने दोघे भाऊही सध्या भलतेच खूश आहेत. दोघेही विज्ञान शाखेतून आपले करिअर करू इच्छितात.

दोघांच्या सवयीही सारख्याच

राहन, राहुल यांची आई सांगते की, दोघेही दिसायला एकसारखेच आहेत. पण, त्यांच्या सवयीही सारख्या आहेत. दोघे एकाच वेळी आजारी पडतात आणि दोघांनाही एकाच वेळी भूक लागते. आता तर, दोगांना समान मार्क्स मिळालेले पाहून आम्हीही आश्चर्यचकित झालो आहोत.

हे दोन्ही भाऊ एकाच वर्गात शिकतात आणि एकाच घरात एकत्र अभ्यास करतात.

Read More