Marathi News> मुंबई
Advertisement

व्हेंटिलेटरवर असलेल्या बांधकाम उद्योगाला जीवनदान देण्यासाठी आव्हाडांनी सुचवला 'हा' पर्याय

मुंबईला एका बुस्टर डोसची गरज आहे.....

व्हेंटिलेटरवर असलेल्या बांधकाम उद्योगाला जीवनदान देण्यासाठी आव्हाडांनी सुचवला 'हा' पर्याय

मुंबई : कोरोनामुळे मुंबईचे अर्थकारण घसरलेले आहे. कोरोनामुळे सगळे उद्योगधंदे बंद आहेत. कोरोनामुळे मुंबईतील आरोग्य व्यवस्था देखील कोलमडली आहे. देशातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखला जाणारा 'धारावी' हा परिसर आता मुंबईची 'कोविड कॅपिटल' म्हणून नवीन ओळख निर्माण करत आहे. 

कोरोनामुळे धारावीसारख्या झोपडपट्ट्यांमध्ये कोणत्याही दर्जाच्या आरोग्य व्यवस्था नसल्यामुळे उपचार यंत्रणा पूर्णतः कोलमडून पडलेली दिसली. लोकांच्या मनात धारावीबद्दल नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता धारावीच्या पुर्नःविकासाएवढी सुंदर, सामाजिक, आर्थिक संधी महाविकास आघाडीला मिळणार नाही, अशा आशयाचं पत्र बांधकाम मंत्री जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. 

धारावीच्या विकासाची घोषणा मागील सरकारच्या काळात करण्यात आली होती. कोरोनामुळे मुंबईचे अर्थकारण घसरलेले आहे. अशा परिस्थितीत धारावीच्या पुनःविकासाचा निर्णय घेतला तर तो फायद्याचं ठरेल असं आव्हाडांनी म्हटलं आहे. 

धारावी पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ आहे. त्याचप्रमाणे यावेळी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. कोरोनामुळे थांबलेल्या आर्थिक उलाढालीला पुन्हा सुरवात होईल, अशा आशयाचं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे. या निर्णयामुळे व्हेंटिलेटरवर असलेल्या बांधकाम उद्योगाला जीवन दान मिळेल. मुंबईला एका बुस्टर डोसची गरज आहे तो  धारावी पुनर्विकास असेल असं या पत्रात मांडण्यात आलं आहे. 

काही दिवसांपूर्वीच कोरोनावर यशस्वीपणे मात करून रुग्णालयातून घरी परतलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ट्विटरवर एका युजरकडून धमकी देण्यात आल्यामुळे आव्हाड चांगलेच संतापले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपण कोरोनातून बरे झाल्याचे ट्विट केले होते. यावर एका युजरने आक्षेपार्ह कमेंट केली होती.

यामध्ये जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून म्हटले होते की, भिडे गुरुजी आणि मंडळी वाट बघत आहेत तुमची. त्यामुळे घराच्या बाहेर पडू नका, असे म्हटले होते.  यानंतर आव्हाड यांनी याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा प्रकार गंभीर नाही का? याची दखल कोण घेणार? ही थेट जीवे मारण्याची धमकी आहे. मला आशा आहे की, संबंधित यंत्रणा याची दखल घेतील, असे जितेंद्र आव्डाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

Read More