Marathi News> मुंबई
Advertisement

प्रभाकर साईलने तक्रार दाखल केली तर... गृहमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली

प्रभाकर साईलने तक्रार दाखल केली तर... गृहमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडली. आर्यन खान ड्रग्स प्रकरणी धक्कादायक गौप्यस्फोट करणाऱ्या प्रभाकर साईल याला पोलीस संरक्षण दिल्याची माहिती या बैठकीनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यापासून आपल्या आणि आपल्या कुटुंबियांना धोका असल्याचं प्रभाकर यांनी म्हटलं होतं. त्यामुळे पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी प्रभाकर साईल याने केली होती. 

प्रभाकर साईल याच्या मागणीनुसार पोलीस संरक्षण देण्यात आल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसंच प्रभाकर साईलने पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर गुन्हा दाखल होऊ शकेल, अशी माहितीही गृहमंत्र्यांनी दिली आहे. एफआयआर दाखल करण्यासाठी कोणीतरी तक्रार करावी लागते. याबाबत तक्रार केली गेली तर पुढे काय करता येईल ते बघता येईल, असंही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. 

राष्ट्रावादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याप्रकरणी एसआयटी स्थापण करण्याची मागणी केली होती, पण नवाब मलिक आणि माझी भेट झालेली नाही, असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. नवाब मलिक हे निवडणूकांसाठी नांदेडला गेले आहेत. माझी त्यांची चर्चा नाही. ते आल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं जाईल, असं गृहमंत्र्यांनी म्हटलं.

दरम्यान, प्रभाकर साईल यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार साईल यांनी सहार पोलिसांकडे संपूर्ण माहिती नोंदवली आहे. तसंच क्राईम ब्राँचकडे सर्व पुरावे दिल्याचंही प्रभाकर यांच्या वकिलांनी म्हटलं आहे.

प्रभाकर साईलचा आरोप

अभिनेता शाहरुख खानच मुलगा आर्यन खानचं ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी 18 कोटींची डील झाल्याचा धक्कादायक खुलासा किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने केला आहे. प्रकरण दाबण्यासाठी 18 कोटींची डील झाली होती आणि त्यातले 8 कोटी वानखेडेंना दिले जाणार होते असा गंभीर आरोप प्रभाकर साईलने केला आहे. किरण गोसावीच्या सांगण्यावरून साईलने 50 लाख रुपये कलेक्ट केल्याचा खुलासा त्याने केला आहे. या 50 लाखांतले 38 लाख रुपये सॅम डीसोझाला दिल्याचा दावा देखील प्रभाकर साईल याने केला आहे. 

Read More