Marathi News> मुंबई
Advertisement

परमबीरसिंग यांना उच्च न्यायालयाने फटकारलं, कोर्टात काय झालं ?

आधी एफआयआर रजिस्टर करा असे उच्च न्यायालयाने म्हटले.

परमबीरसिंग यांना उच्च न्यायालयाने फटकारलं, कोर्टात काय झालं ?

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यावेळी उच्च न्यायालयाने परमबीरसिंग यांना फटकारले. त्रयस्थ व्यक्तीने सांगितले आहे त्यावर आपण आरोप करत आहात. आधी एफआयआर रजिस्टर करा असे उच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना म्हटले आहे. 

तुम्ही आयुक्त होता तेव्हा एफ आय आर का नाही केला असा प्रश्न उच्च न्यायालयाने उपस्थित केला. परमबीर सिंग हे मुंबाईं पोलीस आयुक्त होते. कोणी सामान्य माणूस नव्हते. त्यांना crpc माहीत आहे असेही कोर्टाने म्हटले. एफआयआर असल्याशिवाय सीबीआयकडे केस कशी देणार असा प्रश्न कोर्टाने विचारला.

स्वतंत्रपणे तपास करणाऱ्या संस्थेने परंमबिर सिंग यांनी केलेल्या आरोपाची चौकशी करावी अशी मागणी उच्च न्यायालयात परमबीर सिंग यांच्यातर्फे करण्यात आली आहे.

ही जनहित याचिका ट्रान्सफर ऑर्डरसाठी म्हणून केलेली नाही. आपल्यासोबत झाले आहे का असा प्रश्न कोर्टाने परमबीरसंह यांना विचारला. आपण आरोप केले आहेत, तुम्ही स्वतःतिथे होता का ? असेही विचारले.

याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात सिविल सूट फाईल केला होता. आणि आता त्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका फाईल केली आहे. ती ही क्रिमिनल याचिका दाखल केली आहे. त्यांनी आपली वैयक्तिक तक्रार या PIL मध्ये दाखल केली आहे. आणि है सर्व जनहिताचा विषय होउ शकत नाही अशी बाजू महाराष्ट्र सरकारचे एडवोकेट जनरल आशुतोष कुम्भकोणी यांनी मांडली.
ही जनहित याचिका स्वीकार करण्यासारखी नाही. इतर दोन याचिका सुद्धा योग्य नसल्याचे ते म्हणाले.

सहाय्यक पोलीस आयुक्त पाटील यांनी कोणतेही एफिडेव्हिडं कोर्टाला दिले नसल्याचे कोर्टाने म्हटले. दरम्यान परमबीर सिंग यांच्या वकिलांकडून आजची सुनावणी उद्या ठेवावी अशी विनंती करण्यात आली आहे.

Read More