Marathi News> मुंबई
Advertisement

जड वाहनांवरील टोल वाढीसंदर्भात महत्वाचा निर्णय

 जड वाहनांसाठी पथकर दरामध्ये काही प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

जड वाहनांवरील टोल वाढीसंदर्भात महत्वाचा निर्णय

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : जड वाहनांवर १० % टोल वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील १५ टोल नाक्यावर ही वाढ लागू होणार आहे. तसेच हलक्या वाहनांवरील सूट कायमच राहणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खासगीकरण प्रकल्पांवर केवळ जड वाहनांसाठी पथकर दरामध्ये काही प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच कार, जीप, एसटी, स्कूल बसेस आणि हलकी वाहने यांची सूट कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

सध्या राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १५ प्रकल्पांतर्गत वाहनांना पथकरातून सूट मिळणार आहे. ही सूट दिल्यामुळे या पथकर उद्योजकांना शासनास ३५० ते ४०० कोटी नुकसान भरपाई दरवर्षी द्यावी लागते. ही नुकसान भरपाई रोखीने न देता जड वाहनांवरील पथकर काही प्रमाणात वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Read More