Marathi News> मुंबई
Advertisement

तुम्ही कधी मस्का मारलेला चहा घेतलाय? मग हे नक्की वाचा

असा मस्का टाकलेला चहा तुम्ही प्याल का...?

तुम्ही कधी मस्का मारलेला चहा घेतलाय? मग हे नक्की वाचा

ऋचा वझेसह ब्युरो रिपोर्ट, झी २४ तास : आग्र्याच्या बाबा टी स्टॉलवरचा हा बटर टी... सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झालाय. पाव भाजीमध्ये मस्तपैकी बटर टाकावं, तसं हा चायवाला चक्क उकळत्या चहामध्ये बटरचे स्लाईस कापून टाकतोय. चहाचा स्वाद वाढवण्यासाठी आपण वेलची किंवा मसाला टाकतो... अगदी मलई मारलेला चहा देखील तुम्ही नक्की घेतला असेल. पण असा मस्का टाकलेला चहा तुम्ही प्याल का...?

या बटर टीवरून सध्या नव्या वादाला तोंड फुटलंय.. काही चहाप्रेमींनी नाकं मुरडली. तर काहींनी एकदा ट्राय करून बघायला काय हरकत आहे, असा सूर लावला.

बटर मारलेला हा चहा आरोग्याला घातक ठरू शकतो. यामुळं कॉलेस्ट्रॉल वाढून शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतात, अशीही भीती व्यक्त केली जातेय.

थोडा हटके प्रयोग म्हणून असा बटर चहा ट्राय करायला हरकत नाही... पण त्यामुळं शरीरावर घातक परिणाम तर होणार नाहीत ना, याची काळजी प्रत्येकानं घ्यायला पाहिजे. अन्यथा बटरचा हा मॅटर तुमची टेस्ट बिघडवू शकतो.

Read More