Marathi News> मुंबई
Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वेतन कराराची घोषणा

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. १ मेच्या आगोदरच वेतन निश्चितीचा करार केला जाईल, अशी घोषणा दिवाकर रावतेंनी केली आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वेतन कराराची घोषणा

मुंबई : परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. १ मेच्या आगोदरच वेतन निश्चितीचा करार केला जाईल, अशी घोषणा दिवाकर रावतेंनी केली आहे. सोमवारी मुंबई सेंट्रल इथल्या एसटी मुख्यालयात परिवहन मंत्र्यांसोबत सर्व एसटी कामगार संघटनेची बैठक झाली. या बैठकीत यावर तोडगा निघाला.

दिवाकर रावतेंच्या या आश्वासनानंतर एसटी कामगार संघटनांनीही समाधान व्यक्त केले आहे. गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांकडून वेतननिश्चितीची मागणी केली जात आहे. वेतनवाढी संदर्भात कामगार संघटनेनं ऐन दिवाळीत चार दिवसांचा संपही पुकारला होता. 

नव्या वेतन करारामध्ये सध्या कार्यरत असलेल्या सुमारे ६० हजार कनिष्ठ वेतन श्रेणीवरील कामगारांना पगारवाढ मिळण्याच्या दृष्टीने योग्य तरतूद करण्यात येईल. या निमित्ताने कामगार नेतृत्वाने वेतनवाढीच्या बाबतीत कामगारांमध्ये असलेली संभ्रमावस्था दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे रावते म्हणालेत.

Read More