Marathi News> मुंबई
Advertisement

पेन्शन धारकांना दिलासा, हयात प्रमाणपत्र सादर करण्याची तारीख 'इतके' दिवस वाढवली

 पेन्शन धारकांना हयातीचा दाखला जमा करण्याची तारीख वाढवण्यात आली

पेन्शन धारकांना दिलासा, हयात प्रमाणपत्र सादर करण्याची तारीख 'इतके' दिवस वाढवली

मुंबई : पेन्शन धारकांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येतेय. पेन्शन धारकांना वेळोवेळी हयात प्रमाणपत्र दाखवणे अनिवार्य असते. असे न केल्यास त्यांची पेन्शन रद्द होऊ शकते. पण आता केंद्र सरकारने यासंदर्भात गूड न्यूज दिलीय. पेन्शन धारकांना हयातीचा दाखला जमा करण्याची तारीख वाढवण्यात आलीय.

आता पेन्शन धारकांना हयातीचा दाखला 28 फेब्रुवारीपर्यंत देता येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली. कोरोना काळात ज्येष्ठ नागरिकांना बाहेर पडणं कठीण होतं. अशावेळी बॅंकेत उपस्थित राहून ओळखपत्र दाखवून सही करणं किंवा ठसे देणं शक्य नव्हत. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी बाहेर पडणं टाळलं. अशा ज्येष्ठ नागरिकांना या वृत्तामुळे दिलासा मिळालाय. त्यांना आपले हयात प्रमाणपत्र फेब्रुवारीपर्यंत सादर करण्यात येणार आहे.

Read More