Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 7 आणि मेट्रो 2A 'या' महिन्यात सुरु होणार?

दररोज तीस लाख नागरिक मेट्रो मार्गावरुन प्रवास करु शकणार

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 7 आणि मेट्रो 2A 'या' महिन्यात सुरु होणार?

मेघा कुचिक, झी मीडिया मुंबई : पश्चिम मुंबईतील 'मेट्रो मार्ग 7' (Metro 7)(दहिसर पूर्व-अंधेरी पूर्व) आणि लिंक रोडलगतची मेट्रो 2A (Metro 2A) चे (दहिसर डीएन नगर) 98 टक्के काम पूर्ण झालं आहे. मार्गांवरील मेट्रो चाचणी ऑक्टोबरपर्यंत सुरू होईल आणि डिसेंबरपर्यंत मेट्रो प्रत्यक्षात सुरू होतील अशी माहिती MMRDA ने दिली आहे. 

एमएमआरडीएने यावर्षी एप्रिलमध्ये केवळ 20 किलोमीटरवर मेट्रो सुरू केली होती. मेट्रो संपूर्णपणे सूरु झाली की दररोज तीस लाख नागरिक या मेट्रो मार्गावरून प्रवास करू शकणार आहेत. या दोन्ही मेट्रो मार्गांवर 30 स्टेशन्स असणार आहेत. याशिवाय, नवीन मेट्रो मार्ग 2A आणि मेट्रो 7 सध्याच्या अस्तित्वात असलेल्या मेट्रो 1 शी देखील जोडले जाणार आहेत. सध्याची मेट्रो घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान सुरू आहे. 

मेट्रो उपनगरांना जोडणार 
पश्चिम उपनगरांशी मेट्रो पूर्णपणे जोडण्यासाठी एमएमआरडीए 'मेट्रो मार्ग 7' वर गोरेगाव स्थानकावर फूट ओव्हरब्रिजचीही तयार केला जाणार आहे. यासाठी MMRDA लवकरच निविदा काढणार आहे.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 ऑक्टोबर 2015 रोजी दोन्ही मार्गांची पायाभरणी केली होती. 2019 मध्ये ऑपरेशनल डेडलाइन होती. मात्र डेडलाईन 2020 पर्यंत पुढे ढकलल्यानंतर कोव्हीडमुळे कामाला अजून उशीर झाला. 

Read More