Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, आता प्रवास वेगवान आणि सुखकर

Mumbai Metro News : मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुखकर, वेगवान आणि गारेगार होणार आहे. कारण, मुंबईत आता लवकरच मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 सुरू होणार आहे. 

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, आता प्रवास वेगवान आणि सुखकर

मुंबई :  Mumbai Metro News : मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुखकर, वेगवान आणि गारेगार होणार आहे. कारण, मुंबईत आता लवकरच मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 सुरू होणार आहे. मार्चपासून मुंबईकरांच्या सेवेत ही मेट्रो येण्याची शक्यता आहे. (Metro 2A and Metro 7 will be launched in Mumbai soon)

मेट्रो गाड्यांची सुरक्षा चाचणी पूर्ण झाली असून, फक्त आता रुळांची चाचणी बाकी आहे. सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यावर हा मार्ग मोकळा होणार आहे. मेट्रो 2 अ हा मार्ग दहिसर ते डी. एन. नगर असा आहे. तर दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो 7 असा हा मार्ग आहे. त्यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो 2 अ आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो 7 मार्गिकेतील मेट्रो गाडय़ांची सुरक्षा चाचणी पूर्ण झाली आहे. आता रुळांची चाचणी प्रक्रिया पुढील काही दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता असून मार्चमध्ये या दोन्ही मेट्रो सेवा कार्यरत होतील. कोरोना, टाळेबंदीसह तांत्रिक अडचणींमुळे या दोन्ही मेट्रो मार्गिकांची कामे वर्षभर रखडली होती. आता पुन्हा कामांने वेग घेतला आहे.

दरम्यान, संपूर्ण मार्गिकेचे काम पूर्ण होण्यास वेळ लागणार आहे. या मार्गिका दोन टप्प्यांत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मेट्रो2 अमधील डहाणूकरवाडी ते आरे आणि मेट्रो 7मधील दहिसर ते आरे असा पहिला टप्पा सुरू करण्यात येणार आहे. दोन्ही मार्गिकेतील पहिल्या टप्प्यातील संपूर्ण काम पूर्ण झाले आहे. 

या दोन्ही मार्गिकेसाठी सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मार्चमध्ये दोन्ही मार्गातील पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला होईल. सिग्नल चाचणी पूर्ण झाली असून रेल्वे मंत्रालयाची परवानगीही मिळाली आहे. आता केवळ सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याचीच एमएमआरडीएला प्रतिक्षा आहे.

Read More