Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबईकरांसाठी गुडन्यूज! आधी तिकीट दर कमी, आता ४०० एसी बसची भर

बेस्टच्या ताफ्यात नव्याने ४०० एसी बस दाखल होणार आहेत.

मुंबईकरांसाठी गुडन्यूज! आधी तिकीट दर कमी, आता ४०० एसी बसची भर

मुंबई : बेस्ट प्रशासनाकडून मुंबईकरांसाठी आणखी एक गुडन्यूज देण्यात आली आहे. मुंबईतील प्रवास नकोसा होत असताना तो कसा चांगला अधिक होईल, यावर भर देताना तो स्वस्त करण्यावर भर देण्यात येत आहे. बेस्टच्या ताफ्यात नव्याने ४०० एसी बस सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान, आधी अल्प प्रतिसाद मिळाल्याने काही मार्गावरील एसी बस थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता बेस्टच्या भाड्यात कपात करत तो पाच रुपयांपासून सुरु केला आहे. तर एसी बस सहा रुपयांपासून सुरु होणार आहे. त्यामुळे मुंबईकर या नव्या निर्णयाने खूश आहेत.

मुंबई बेस्ट आपल्या ताफ्यात एसी बसेसची असलेली कमतरता भरून काढण्यासाठी ४०० मिनी एसी बसेसच्या खरेदी प्रस्तावाला बेस्ट समितीने मंजुरी दिली आहे. ऑगस्ट महिन्यात पहिल्या शंभर ते दोनशे एसी बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा स्वस्त प्रवास होईल आणि घामातून सुटका होण्यास मदत होणार आहे.

बेस्टने वेट लीजवर भाडेतत्त्वावरील ४५० बसेस खरेदी करण्याचा मूळ करार फेब्रुवारी २०१८ मध्ये केला होता. मात्र याविरोधात युनियन न्यायालयात गेल्यानंतर निविदा काढण्याचे रखडल्याने त्यामध्ये बदल करण्यात आला. आता हा प्रस्ताव पुन्हा मंगळवारी बेस्ट कमिटीत चर्चेला आला. या करारात चालकाचे वय २१ ते ५८ दरम्यान असावे असे नमूद करण्यात आल्याने कमाल वय कमी करावे, अशी मागणी बेस्ट सदस्य सुनील गणाचार्य यांनी केली. तसेच रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी या बस सुरु राहाव्यात अशी शिवसनेने मागणी केली आहे.

 बेस्टच्या ताफ्यात सुरुवातीला १०० ते २०० एससी बसेस दाखल होणार आहेत. आधीच्या कराराप्रमाणे मिडी बसेस पुरविण्यास वाहन उत्पादकाने असमर्थता व्यक्त केल्याने आता त्याऐवजी संपूर्ण मिनी एसी बसेस खरेदी करण्यात येणार आहे. ऑगस्टपर्यंत पहिल्या १०० ते २०० एसी बसेस दाखल होणार आहेत. नोव्हेंबरपर्यंत एकूण ४००एसी बसेसचा समावेश होईल, असे बेस्टकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Read More