Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबई पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! बोनस जाहीर

कोरोना संसर्गाच्या कठिण काळात मुंबई मनपा आणि बेस्ट कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम केलं

मुंबई पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! बोनस जाहीर

मुंबई : कोरोना संकटाच्या काळात अहोरात्र झटणाऱ्या मुंबई महानगरपालिका (BEST) आणि बेस्ट (BEST) कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेण्यात आलं आहे. कोरोना काळात काम केल्याचं कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट मिळालं आहे. कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांनी आज ही घोषणा केली.

या घोषणेमुळे मुंबई महापालिकेच्या 1 लाखाहून अधिक आणि बेस्टच्या 34 हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. विशेष म्हणजे पुढची तीन वर्ष 20 हजार रुपये दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना संसर्गाच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या सेवेसाठी मुंबई महानगरापालिका आणि बेस्टने महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. या कठीण काळात अनेक पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचंही निष्पन्न झालं होतं. या संसर्गाच्या कठीण काळात महत्वपूर्ण कामगिरीमुळे पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आला आहे.

Read More