Marathi News> मुंबई
Advertisement

Gold Price Today | उच्चांकी भावाच्या तुलनेत सोने अजुनही स्वस्त; जाणून घ्या आजचा भाव

रोजच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असतो. तसाच परिणाम सोन्याच्या भावातही होत असतो.

Gold Price Today | उच्चांकी भावाच्या तुलनेत सोने अजुनही स्वस्त; जाणून घ्या आजचा भाव

मुंबई : कोरोना संसर्गामुळे देशातील वेगवेगळ्या भागात लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती आहे. रोजच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असतो. तसाच परिणाम सोन्याच्या भावातही होत असतो. गेल्या 2 आठवड्यापासून सोन्याच्या भावात हळुहळू वाढ होत आहे. तसेच आज (19 एप्रिल) लाही सोन्याच्या दरात वाढ झालेली दिसून आली. 

महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक बनली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीतही लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे शेअर बाजारतही घसरण दिसून आली.

गेल्यावर्षी देखील लॉकडाऊन काळात सोन्याचे भाव 55 हजार प्रतितोळ्याच्या वर गेले होते. नुकत्याच फेब्रुवारी मार्च 2021 दरम्यान सोन्याच्या भावाने मोठी घसरण नोंदवली होती. यावेळी सोने 43 हजार 700 रुपये प्रतितोळा भावाने विकले जात होते.

आज सोन्याची किंमत 49 हजार रुपये प्रतितोळे इतकी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. तरी देखील सोने उच्चांकी दरापासून कमी किंमतीत मिळतेय तिच काय समाधानाची बाब होय.

Read More