Marathi News> मुंबई
Advertisement

लोकलमधून खाली पडली तरुणी अन्... धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

लोकलमधून खाली पडली तरुणी अन्... धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

मुंबई : आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, ती दृश्यं अतिशय धक्कादायक आहेत. मुंबईतल्या लोकलमधली ही दृश्यं.... लोकलच्या दरवाज्यात उभं राहून मस्ती करणं जीवावर बेतू शकतं, याचा हा धक्कादायक व्हिडीओ. एक मुलगी एका मुलासोबत  लोकलच्या दरवाजात अत्यंत बेसावधपणे उभी आहे. लोकलमध्ये गर्दी नसतानाही आतमध्ये बसायला आणि उभं राहायला जागा असतानाही हे दोघे दरवाजामध्ये उभे आहेत. 

थोडक्यात वाचला जीव

तेवढ्यात बाजूनं दुसरी लोकल वेगात येते आणि तेवढ्यात या मुलीचा हात सुटतो. ती मुलगी खाली जाते. सुदैवानं कसंबसं खेचून तिला वर उचलण्यात आलं, तिचा जीव वाचला. ती खाली घसरताना तिच्या मित्रानं आणि ट्रेनमधल्या एका व्यक्तीनं तिला सुदैवानं घट्ट पकडलं. तिचा हात सुटू दिला नाही. त्यामुळे ती कशीबशी वाचली. 

तुमची घरी कुणीतरी वाट पाहतंय

पण हे भलतं साहस जीवावर बेतू शकलं असतं. त्यामुळे हे भलतं साहस तुम्ही करू नका. हा व्हिडीओ नेमका कुठल्या लोकलमधला आहे आणि कधीचा आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. पण मुंबईकरांनो, लोकलमधून सुरक्षित प्रवास करा. तुमची घरी कुणीतरी वाट पाहतंय, हे लक्षात ठेवा.

Read More