Marathi News> मुंबई
Advertisement

घाटकोपर दुर्घटना : मृत्युपूर्वी महिला पायलटच्या सतर्कतेमुळे वाचले हजारो जीव

लवकरच हा अपघात नेमका कसा घडला यामागचं कारणही समोर येऊ शकेल

घाटकोपर दुर्घटना : मृत्युपूर्वी महिला पायलटच्या सतर्कतेमुळे वाचले हजारो जीव

मुंबई : मुंबईत घाटकोपरमध्ये घडलेल्या विमान दुर्घटनेत महत्त्वाची माहिती हाती येतेय. या दुर्घटनेत पायलटनं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे प्राण वाचलेत. विमान कोसळतंय हे लक्षात येताच पायलटनं कमी रहदारी असलेल्या मोकळ्या जागेत विमान उतरवण्याचा प्रयत्न केला... आणि एका बांधकाम सुरु असलेल्या मोकळ्या जागेत हे विमान कोसळलं... भटवाडीसारख्या दाटीवाटीच्या भागात हे विमान कोसळलं असतं तर आज अनर्थ घडला असता. उल्लेखनीय म्हणजे, हे विमान एक महिला पायलट हाताळत होती.  

या विमान अपघातात पायलट मारिया कुबेर, को-पायलट प्रदीप राजपूत, विमान तंत्रज्ञ सुरभी, विमान तंत्रज्ञ मनिष पांडे यांनी आपला जीव गमावलाय... तर या दुर्घटनेत एका पादचाऱ्याचाही मृत्यू झालाय... तर लवकुश कुमार (२१ वर्ष) आणि नरेशकुमार निशाद (२४ वर्ष) हे दोघे जण जखमी झालेत. या विमानाचा ब्लॅक बॉक्सही सुरक्षा यंत्रणेच्या हाती लागलाय. त्यामुळे लवकरच हा अपघात नेमका कसा घडला यामागचं कारणही समोर येऊ शकेल. 

'यूवाय एव्हिएशन'चं सी ९० प्रकाराचं हे चार्टर्ड विमान होतं. ३० प्रवासी क्षमता असलेलं हे चार्टर्ड विमान जुहू हेलिपॅडहून टेस्टिंगसाठी निघालं होतं... उत्तरप्रदेश सरकारनं २०१४ मध्ये खाजगी कंपनीला हे विमान विकण्यात आलं होतं, असं समजतंय
 

Read More