Marathi News> मुंबई
Advertisement

मोफत लसीकरणासाठी बीएमसीतून आर्थिक मदत घ्या, शिवसेना खासदाराच्या मागणीवर महापौरांची प्रतिक्रिया

 शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्र लिहिलंय 

मोफत लसीकरणासाठी बीएमसीतून आर्थिक मदत घ्या, शिवसेना खासदाराच्या मागणीवर महापौरांची प्रतिक्रिया

मुंबई : राज्यातील सर्व नागरिकांना कोरोनाची मोफत लस (Free Vaccine)  देण्यासाठी राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेची (BMC) आर्थिक मदत घ्यावी, अशी विनंती खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे. शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्र लिहिलंय.

1 मे पासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेत 18 वर्षांवरील सर्वांना राज्य सरकारमार्फत मोफत कोरोना लस देण्यात यावी. यासाठी साधारण साडे पाच हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. देशातील सगळ्यात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे 79 हजार कोटींच्या ठेवी विविध बँकांमध्ये ठेवलेल्या आहेत. राज्य सरकारने मोफत लसीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेच्या या निधीचा वापर करावा असे शेवाळे यांनी म्हटले. तसेच राज्य सरकारने पालिकेचा हा निधी काही वर्षांनी परत द्यावा, असेही खासदार शेवाळे यांनी सुचविले.

यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishore Pedanekar) यांनी प्रतिक्रिया दिलीय. लसींचा पुरवठा वेळेवर झाला तर ऑगस्ट सप्टेंबर शेवटापर्यंत मुंबईचं लसीकरण पूर्ण होईल अशी आशा महापौरांनी व्यक्त केलीय. 

राहुल शेवाळेंनी बीएमसीच्या आर्थिक मदतीतून मोफत लसिकरणाची केलेली मागणी चांगली आहे. मात्र, ज्यांना पैसे देऊन लस विकत घेता येऊ शकेल त्यांनी ती विकत घ्यावी असेही महापौर पुढे म्हणाल्या.

मोहिमेला ब्रेक ?

राज्यासह देशभरात 1 मेपासून 18 वर्षावरील व्यक्तींसाठी लसीकरणास (Vaccination) सुरुवात होणार आहे. पण प्रत्यक्षात इतक्या लसींचा पुरवठा झाला नसल्याचे राज्यात 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरण मोहिमेला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. 

लशींचा पुरेसा साठा नसताना इतक्या मोठ्या संख्येतील जनतेचे लसीकरण कसे करायचे ? असा प्रश्न आरोग्य यंत्रणेला पडलाय. त्यामुळं तीन दिवसांवर आलेली 18 वर्षांवरील वयोगटातील लसीकरण मोहिम राज्य सरकार पुढे ढकलण्याची शक्यता असल्याची माहीती सुत्रांनी दिलीय. लसच उपलब्ध नसल्याने आरोग्य यंत्रणा बुचकळ्यात आहे. 

Read More