Marathi News> मुंबई
Advertisement

'ओ शेठ तुम्ही नादचं केलाय थेट...' सर्वांना भुरळ घालणारी ती सौंदर्यवती कोण?

'ही' सौंदर्यवती का ठरतीये चर्चेचा विषय... नक्की कोण आहे ती?   

'ओ शेठ तुम्ही नादचं केलाय थेट...' सर्वांना भुरळ घालणारी ती सौंदर्यवती कोण?

मुंबई : मुलींच्या सर्वात आवडतीचा विषय म्हणजे मेकअप... कोणताही कार्यक्रम किंवा सण असला, तरी प्रत्येक स्त्री स्वतःला सजवण्यासाठी टिकली, दागीने.... इत्यादी गोष्टींचा उपयोग करते. पण सध्या सर्वत्र ज्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहेत, त्या मुलीचं सौंदर्य म्हणजे जणू काही एक आश्चर्य. आज गुढीपाडव्यानिमित्त अनेक ठिकाणी शोभा यात्रेचं आयोजन करण्यात आलं. तेव्हा गिरगावच्या शोभा यात्रेत एका सुंदर तरूणीने आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ केलं.

या मुलीचं नाव आहे गौरी मोरे.... शोभा यात्रेत केंद्रबिंदू ठरणारी सौंदर्यवती म्हणते, 'दोन वर्ष फक्त आम्ही या तयारीची प्रतीक्षा करत होतो. माराठमोळा लूक साकारण्यासाठी प्रचंड मेहनत लागली.. महत्त्वाचं म्हणजे आजच्या क्षणाची उत्सुकता फार आहे.' सध्या तिचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

दरम्यान, दोन वर्षानंतर सर्व काही सुरळीत झाल्यामुळे प्रत्येक जण आनंदाने आणि नव्या उत्साने नव्या वर्षाचं स्वागत करत आहे... गेली दोन वर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी रस्त्यांवर शुकशुकाट होता, पण आता कोरोना निर्बंध हटवल्यामुळे प्रत्येक जण मास्क मुक्त गुढीपाडवा साजरा करत आहे.

Read More