Marathi News> मुंबई
Advertisement

मराठमोळ्या तरूणाचं चालतं फिरतं 'गॅरेज'

संपूर्ण महाराष्ट्रात सेवा पुरवणार हे गॅरेज 

मराठमोळ्या तरूणाचं चालतं फिरतं 'गॅरेज'

मुंबई : चालतं फिरतं हॉटेल, चालतं फिरतं घर, अगदी चालत्या फिरत्या महालाच्या गोष्टी तुम्ही सर्रास ऐकल्या असतील. पण चालत्या फिरत्या गॅरेजबद्दल तुम्ही कधी ऐकलंय का? हो. नुकतीच या चालत्या फिरत्या गॅरेजची संकल्पना रूढ झाली आहे. डोंबिवलीच्या सागर जोशी या मराठमोळ्या तरुणाने ही शोधून काढलेली ही आयडियाची कल्पना. या जगात काहीच अशक्य नाही ही गोष्ट या चालत्या फिरत्या गॅरेजच्या निमित्ताने सिद्धच झाली आहे. आजकालच्या जगात गाड्यांशिवाय पर्याय नाही आणि नेमकं वेळेवर पोहोचायचं असताना आयत्या वेळी गाडी बंद पडते आणि तिला गॅरेजपर्यंत ढकलत न्यायचे कष्ट घ्यावे लागतात. पण आता मात्र तुम्हाला इतके कष्ट घ्यायची वेळच येणार नाही. कारण स्वतःहून गॅरेज तुमच्या मदतीला धावून येईल. अगदी तुम्ही असाल तिथे....

आर.एस.ए ऑटोकेअर प्रा. ली. म्हणजेच ‘रोड साईड असीस्टन्स’ या संस्थेने चालत्या फिरत्या गॅरेजची ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे.  ‘ऑटो आय केअर’ ‘गॅरेज ऑन व्हिल’ असे याचे नाव असून, अशा आगळ्यावेगळ्या उपक्रमांना प्रोत्साहन देणाऱ्या या संस्थेचं कौतुक करावं तितकं कमीच आहे.  ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आर.एस.एने महाराष्ट्रातल्या तब्बल १८००० गॅरेजेसशी संपर्क साधला. यातूनच अनेक सामान्य बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराची सुवर्ण संधीच उपलब्ध झाली. या आगळ्या वेगळ्या संकल्पनेमुळे महाराष्ट्रात गाडी चालवणारा प्रत्येक माणूस निर्धास्त होऊन गाडी चालवेल. कारण आता ती बंद पडण्याची चिंता नसेल आणि यदाकदाचित गाडी बंद पडलीच तर १८००१२०१२०३ हा टोल फ्री क्रमांक डायल करायचा आणि     आर.एस.एचं चालतं फिरतं गॅरेज तत्काळ तुमच्या सेवेसाठी हजर होईल. तेदेखील अगदी माफक दरात.

याव्यतिरिक्त ही सेवा आणखीन सोयीस्कर व्हावी याकरिता आर.एस.एचं स्वतःचं अॅप्लिकेशनही प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. जे एकही पैसा खर्च न करता तुम्ही डाऊनलोड करु शकता आणि आर एस ए त्यांच्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन अगदी रास्त दरात एक वर्षाची मेम्बरशीपही  उपलब्ध करुन देतं. तसंच जर  आर.एस.एचं हे अॅप तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर  तर त्याच्या सहाय्याने तुम्ही ईमेलच्या माध्यमातूनही त्यांचाशी संपर्कात राहू शकता. शिवाय या आर.एस.ए अॅपप्लिकेशनवर एक खास सुविधाही उपलब्ध आहे. ती अशी की या अॅपवर लॉग इन करून तुम्ही याविषयी तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांना सुचवू शकता. आहे की नाही भारी? गाडी बिघडल्यानंतर कुठल्याही व्यक्तीची गॅरेजवाल्यांकडून फसवणूक होऊ नये व त्यांना अडचणीच्या वेळी सर्वोत्तम सेवा पुरवली जावी, यादृष्टीने आर.एस.ए सध्या जोमाने कामाला लागले आहे.

Read More