Marathi News> मुंबई
Advertisement

शेतकरी संपाचा चौथा दिवस; सर्वसामान्यांना फटका बसण्यास सुरूवात

दादरच्या भाजी मंडईत भाज्यांची आवर ही ५० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव जवळपास दुपटीने वाढले आहेत.

शेतकरी संपाचा चौथा दिवस; सर्वसामान्यांना फटका बसण्यास सुरूवात

मुंबई: राष्ट्रीय किसान माहासंघाने घोषीत केलेल्या शेतकरी संपाचा आज (सोमवार, ४ जून) चौथा दिवस आहे. आता या संपाचा फटका सामान्यांना बसण्यास सुरुवात झाली आहे. शेतकरी संपामुळे शेती मालाची आवक घटली असून त्याचा थेट परिणाम हा भाज्यांच्या किमतींवर झाला आहे. दादरच्या भाजी मंडईत भाज्यांची आवर ही ५० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव जवळपास दुपटीने वाढले आहेत.


भाज्यांचे दर(सर्व दर प्रती किलोमध्ये)

टोमेटे पूर्वीचा दर १५ -१६ रूपये, सध्याचा दर ३० रूपये

फरस्बी पूर्वीचा दर ७०-८० रूपये, सध्याचा दर १२० रूपये

वांगी पूर्वीचा दर १५ रूपये, सध्याचा दर २० रू. रूपये

मिरची पूर्वीचा दर ३० रूपये , सध्याचा दर ६० रूपये

दुधी पूर्वीचा दर १५ रूपये , सध्याचा दर २५ रूपये

कारलं पूर्वीचा दर २५ रूपये , सध्याचा दर ४० रूपये

भोपळी मिरची पूर्वीचा दर २० रूपये, सध्याचा दर ४० रूपये

Read More