Marathi News> मुंबई
Advertisement

पतीच्या बिझनेस पार्टर्नरसोबत सेक्सची सक्ती; दाऊदच्या साथीदाराच्या पत्नीचा आरोप

मुंबई पोलिसांकडे नेहमीच मोठमोठ्या गुन्ह्यांसंबधी तक्रारींची नोंद होत असते. परंतु नुकताच एक गुन्हा पोलिसांकडे नोंदवला गेला आहे.

पतीच्या बिझनेस पार्टर्नरसोबत सेक्सची सक्ती; दाऊदच्या साथीदाराच्या पत्नीचा आरोप

मुंबई : मुंबई पोलिसांकडे नेहमीच मोठमोठ्या गुन्ह्यांसंबधी तक्रारींची नोंद होत असते. परंतु नुकताच एक गुन्हा पोलिसांकडे नोंदवला गेला आहे. तो म्हणजेc. मुंबई पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत तिने एक क्रीडापटू आणि राजकीय नेत्याने बलात्कार केल्याचे म्हटले आहे.

पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले की, 'पोलिसांनी FIR नोंदवावा, यासाठी मी प्रयत्न करतेय परंतु ते सहकार्य करीत नाहीत.' रियाज भाटीच्या पत्नीचा अर्ज मिळाला असल्याच्या वृत्ताला पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंघे यांनी दुजारा दिला आहे. 

पोलिसांच्या वतीने अधिक चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. रिजाय भाटीचा गुन्हेगारीचा इतिहास आहे. खंडणी, फसवणूक आणि जमीन बळकावण्याचे त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. 

त्याच्या पत्नीने रियाजवर गंभीर आरोप करीत त्याच्या बिझनेस पार्टनर्स आणि अन्य हाय प्रोफाईल व्यक्तींसोबत शरीरसंबध ठेवण्यास भाग पाडले असे आरोप केले आहेत. 

या व्यक्तींमध्ये एका बड्या राजकीय नेत्याचे तसेच एका क्रीडापटूचेही तिने नाव घेतले आहे,

Read More