Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबईत जुहू चौपाटीवर ५ जण बुडालेत

 जुहू चौपाटीवर ५ जण बुडालेत.  यापैकी एका तरूणाला वाचवण्यात यश आले आहे. 

मुंबईत जुहू चौपाटीवर ५ जण बुडालेत

मुंबई : येथील जुहू चौपाटीवर ५ जण बुडालेत. ही घटना सायंकाळी ५.३० वाजता घडली. यापैकी एका तरूणाला वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान, यातील चौघेजण अद्याप बेपत्ता असून अग्निशमन दलाकडून शोध सुरु आहे.

बुडालेल्यांपैकी एकाला वाचवण्यात सुरक्षा रक्षकाला यश आले असून चौघांचा शोध सुरू आहे. सर्व तरुण अंधेरेतील डी.एन. नगरचे रहिवासी आहेत.

बुडालेल्यांची नावे  

१) फरदीन सौदागार

२) सोहेल खान 

३) फैजल शेख

४) नाझिर गाजी 

५) वसिम खान. या पाच पैकी वसिम खान याला वाचवण्यात यश आले आहे.

Read More