Marathi News> मुंबई
Advertisement

'या' कारणामुळे लागली एमटीएनएलच्या इमारतीला लागली आग?

बचावकार्यादरम्यान अग्निशमन दलाच्या एका जवानाचा श्वास कोंडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

'या' कारणामुळे लागली एमटीएनएलच्या इमारतीला लागली आग?

मुंबई: वांद्रे परिसरातील महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या (एमटीएनएल) सोमवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीचे प्राथमिक कारण आता समोर आले आहे. या इमारतीमध्ये असणाऱ्या वातानुकूलन यंत्रात झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जाते. इमारतीमध्ये लाकूड आणि केबल्सचा मोठा साठा असल्याने आग वेगाने इतर मजल्यांवर पसरत गेल्याची शक्यता अग्निशमन दलाकडून वर्तवण्यात आली आहे. मात्र, चौकशी अहवालानंतरच आगीचे खरे कारण स्पष्ट होऊ शकेल. 

वांद्रे येथील एस. व्ही. रोडवर ही ९ मजली इमारत असून इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली आहे. दुपारी तीनच्या सुमारास आग लागली. 

आग वेगाने इमारतीमध्ये पसरल्यामुळे धुराचे प्रचंड लोट निर्माण झाले. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना जिन्यातून खाली जात आले नाही. अखेर या कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर धाव घेतली. जवळपास १०० कर्मचारी इमारतीच्या गच्चीवर अडकून पडले होते. मात्र, अग्निशमन दल वेळीच घटनास्थळी दाखल झाले. या आगीची तीव्रता लक्षात घेता इतर केंद्रांवरील अग्निशमन दलाच्या गाड्याही याठिकाणी दाखल झाल्या. यानंतर स्नॉर्केलच्या (उंच शिडीच्या) सहाय्याने आतापर्यंत ६० कर्मचाऱ्यांना सुखरुपपणे खाली उतरवण्यात आले. 

बचावकार्यादरम्यान अग्निशमन दलाच्या एका जवानाचा श्वास कोंडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मात्र, अग्निशमन दलाला अजूनही आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. अद्यापपर्यंत कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नसले तरी संपूर्ण आग विझल्यानंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होऊ शकेल. 

Read More