Marathi News> मुंबई
Advertisement

अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबर महिन्यात, ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. 

अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबर महिन्यात, ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल

मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. अंतिम वर्षाची परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेणार तसंच निकाल ३१ ऑक्टोबरपर्यंत लाऊ, असं उदय सामंत म्हणाले आहेत. प्रत्येक कुलगुरूंनी परीक्षा कशा घ्याव्यात, याबाबतचा आपला अहवाल समितीसमोर ठेवला, घरात बसूनच परीक्षा घेण्यास राज्यपालही राजी झाले आहेत, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली. 

१५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत प्रॅक्टिकल परीक्षा होतील आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होतील, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांनी मनात कुठलाच संभ्रम न ठेवता अभ्यासाला लागावं, असं आवाहनही उदय सामंत यांनी केलं. प्रॅक्टिकल परीक्षासुद्धा फिजिकली करायला लागू नये, अशी पद्धत अवलंबणार असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं. 

परीक्षा घेण्याबाबत वेगवेगळे पर्याय समोर येत आहेत, त्यावर चर्चा सुरू आहे. परीक्षा मात्र सोप्या पद्धतीने होतील, यावर एकमत आहे. उरलेल्या बाबींवर आज रात्रीपर्यंत निर्णय घेऊ. आज अहवाल फायनल करुन उद्या दुपारपर्यंत परीक्षा पद्धती कशा घ्यायच्या यावर पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न असल्याचं उदय सामंत म्हणाले. 

परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय करायचं, याबाबतही आम्ही चर्चा करुन निर्णय घेऊ, राज्यपाल आणि आमच्यात विसंगती नाही. आम्ही सर्वजण एकमेकांच्या संपर्कात आहोत, असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं. 

Read More