Marathi News> मुंबई
Advertisement

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

 PMC कथित गैरव्यवहार प्रकरणी बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल.

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (PMC) कथित गैरव्यवहार प्रकरणी बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कट रचून बँकेला फसविण्याचा गुन्हा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशावरून एचडीआयएल आणि बँकेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. तसेच या गुन्ह्याच्या तपाससाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.

पीएमसी बँकेच व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, चेअरमन वरियम सिंग आणि बँकेचे तसेच इतर पदाधिकारी एचडीआयएल कंपनीचे संचालक वाधवा यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरबीआयच्या आदेशावरून सजबीर सिंग मठ्ठा यांनी ही तक्रार दाखल केली होती. बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि संचालकांनी ऑगस्ट २००८ ते २०१९ या कालावधीत भांडूपमधील पीएमसी बँकेतील ठराविक खात्यांची मोठ्या कर्जांची परतफेड होत नसताना ती खाती आरबीआयपासून लपवण्यात आली होती. कमी कर्ज रक्कमेचा बनावट कर्ज खात्यांचा खोटा आणि बनावट अभिलेख तयार करून ही माहिती रिझर्व्ह बँकेला सादर केली. त्यामुळे बँकेला ४३५५.४६ कोटी रुपयांचे नुकसान झाले. 

fallbacks

हा सर्व घोटाळा करण्यात हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ग्रुप ऑफ कंपनीचा पुढकार होता, असा ठपका ठेवण्यात आहे. या कंपनीने बँकेच्या काही पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून संगनमत करून गुन्हेगारीचा कट रचला आहे. कर्जाची परतफेड न करता कर्ज रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला. अशा प्रकारे बँकेची फसवणूक करण्यात आल्याने त्यांच्याविरुद्ध कलम ४०९, ४२०, ४६५, ४६६, ४७१, १२० (ब), या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Read More