Marathi News> मुंबई
Advertisement

शेतकरी धर्मा पाटील यांनी हक्कासाठी लढताना अखेर मृत्यूला कवटाळलं

धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांचं अखेर निधन झालं आहे, धर्मा पाटील यांच्यावर मुंबईतील जेजे रूग्णालयात उपचार सुरू होते.

शेतकरी धर्मा पाटील यांनी हक्कासाठी लढताना अखेर मृत्यूला कवटाळलं

मुंबई : धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांचं अखेर निधन झालं आहे, धर्मा पाटील यांच्यावर मुंबईतील जेजे रूग्णालयात उपचार सुरू होते. धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यातील विखरण गावचे होते.

सरकारशी लढताना मृत्यूला कवटाळलं

धर्मा पाटील यांना जमिनीचा अत्यल्प मोबादला मिळाल्याने, त्यांनी अनेकवेळा मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवल्या होत्या, पण अखेर त्यांना न्याय न मिळाल्याने त्यांना नैराश्य आलं आणि त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यांच्यावर जेजे रूग्णालयात उपचार सुरू होते.

जमीन गेली आणि जीवही गेला

धर्मा पाटील यांच्या शेजारील शेतकऱ्याला काही पटींनी जास्त मोबदला मिळाला होता, पण धर्मा पाटील यांना अत्यल्प मोबदला मिळाला. एजंटच्या सहाय्याने अधिक मोबदला दिला जात असल्याचा आरोप या प्रकरणी होत आहे. धर्मा पाटील यांनी या प्रकरणी मंत्रायलाच्या फेऱ्या मारल्या पण त्यांना दाद न मिळाल्याने त्यांनी आत्महत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे.

Read More