Marathi News> मुंबई
Advertisement

कर्जमाफीचा शासनादेश म्हणजे शेतकऱ्यांचा 'सरसकट विश्वासघात' - अजित नवले

सरकरानं केवळ दोन लाखांपर्यंतची दिलेली कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांचा हा सरसकट विश्वासघात केल्याची टीका अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ अजित नवले यांनी केली आहे.

कर्जमाफीचा शासनादेश म्हणजे शेतकऱ्यांचा 'सरसकट विश्वासघात' - अजित नवले

मुंबई : सरकरानं केवळ दोन लाखांपर्यंतची दिलेली कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांचा हा सरसकट विश्वासघात केल्याची टीका अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ अजित नवले यांनी केली आहे. शेतकरी कर्जमाफीचा काढण्यात आलेल्या शासनादेश म्हणजे विश्वासघाताची परिसीमा आहे. 

शेतकऱ्यांना क्रूरपणे फसविले गेल्याचा आरोप नवलेंनी केलाय. तर ठाकरे सरकारची कर्जमाफी फसवी असल्याची टीका, भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 

राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला. त्यानुसार महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना आता राज्यात लागू झालीय. 

नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झालं. या योजनेनुसार १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंतचे २ लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ होणार आहे. 

योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यामध्ये वित्त नियोजन विभाग व सहकार विभागाचे सचिव, रिझर्व्ह बँक, नाबार्ड आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल. 

राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा बँक, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांच्या मार्फत घेतलेलं कर्ज माफ केलं जाणार आहे.

Read More