Marathi News> मुंबई
Advertisement

Fact Chek! दहावीची बोर्ड परीक्षा होणार नाही? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य

शैक्षणिक धोरणानुसार तीन वर्षानंतर दहावी बोर्डाची परीक्षा होणार नाही, फक्त बारावी बोर्डाच्या परीक्षा होतील, असा मेसेज व्हायरल होत आहे. पण अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका

Fact Chek! दहावीची बोर्ड परीक्षा होणार नाही? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य

Viral News : दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा (SSC-HSC Board Exam) काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. असं असताना आता दहावी बोर्डाची परीक्षा (SSC Exam) यापुढे होणार नाही असा दावा करण्यात आलाय. या दाव्यामुळे विद्यार्थ्याच्या (Student) मनात संभ्रम निर्माण झालाय. खरंच बोर्ड परीक्षा होणार नाही का...? याची खरी माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. त्यामुळे आमच्या व्हायरल पोलखोल टीमनं याची सत्यता पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात. 

व्हायरल मेसेज
शैक्षणिक धोरणानुसार तीन वर्षानंतर दहावी बोर्डाची परीक्षा होणार नाही. फक्त बारावी बोर्डाच्या परीक्षा होतील. 

या मेसेजमुळे आता दहावी बोर्डाच्या परीक्षेला जायचं की नाही...? हा नियम यावर्षीपासून लागू होणार आहे की पुढच्या वर्षीपासून? याबाबत विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न पडलेयत. त्यामुळे याची आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. याबाबत शिक्षण मंडळाकडे विचारणा केली असता, असा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही अशी माहिती मिळाली. मग हा मेसेज कुणी पाठवला? याची तपासणी केली असता काय पोलखोल झाली पाहुयात. 

व्हायरल पोलखोल
दहावी बोर्डाच्या परीक्षा होणार नाही हा मेसेज खोटा

fallbacks
विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यासाठी मेसेज व्हायरल करण्यात आला 

fallbacks

बोर्ड परीक्षेबाबत शिक्षण मंडळाकडून कोणत्याही सूचना नाही

fallbacks

त्यामुळे असे मेसेज पाहून विश्वास ठेवू नका. आमच्या पडताळणीत हा दावा असत्य ठरला.

Read More