Marathi News> मुंबई
Advertisement

EXCLUSIVE! मेकओव्हरसाठी शिवाजी पार्क सज्ज

संध्याछाया आपुलकीनं जपणारं शिवाजीपार्क, दादरकरांचा आत्मा शिवाजी पार्क....

EXCLUSIVE! मेकओव्हरसाठी शिवाजी पार्क सज्ज

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई :  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला घडवणारं शिवाजी पार्क, बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ शिवाजी पार्क, मॉर्निंग वॉकचं शिवाजी पार्क, मित्रांच्या भेटीगाठींच्या अड्यासाठीचा कट्टा असलेलं शिवाजी पार्क, संध्याछाया आपुलकीनं जपणारं शिवाजीपार्क, दादरकरांचा आत्मा शिवाजी पार्क....

सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या शिवाजीपार्कचा आता मेकओव्हर होणार आहे. अर्थात या भागाचा चेहरामोहरा बदलणार आहे. एक लाख स्क्वेअर मीटरच्या या मैदानात आता इतर खेळांसाठीही सुसज्ज अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी मुंबई महापालिकेनं जवळपास ५ कोटींची वित्तीय तरतूद केली आहे.   

येत्या काळात शिवाजी पार्कमध्ये जॉगिंग आणि सायकलिंग ट्रॅक असतील. फूटबॉल, बास्केटबॉल, स्केटिंग, खो-खो, कबड्डी, टेनिस कोर्ट, क्रिकेटसाठी वेगवेगळी पीचेस तयार केली जातील. लहान मुलांना खेळण्यासाठीही वेगळं मैदान इथे असणार आहे. 

महापालिकेच्या या निर्णयाचं विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे. शिवाजी पार्क येथील समर्थ व्यायाम मंदिरातील मुख्य प्रशिक्षक उदय देशपांडे यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं. 'शिवाजी पार्क म्हणजे क्रिकेट असं एक समीकरण आहे. ती ओळख आता बदलू शकेल. मराठी खेळांना आमी इतरही खेळांसाठी इथं खेळण्यासाठी सुविधा दिली जाणार आहे ही चांगली बाब आहे. यामुळे एक सर्व खेळांचं मैदान अशी शिवाजी पार्कची ओळख होईल. या निर्णयाचं स्वागतच करतो', असं ते म्हणाले. याशिवाय खेळाडूंनीही या निर्णयाला दुजोरा दिला आहे.

वाचा : ...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी

सर्व खेळांना मैदान तयार करण्यात आल्यानंतरही ३१% मैदान हे शिल्लक राहतं. ती जागा विविध कार्यक्रमांसाठी वापरता येणार आहे. दोन लाख लोक सहभागी होऊ शकतील एवढी त्या जागेची क्षमता असेल. तेव्हा ज्या मैदानानं क्रिकेटचा देवच जगाला दिला आहे तेच शिवाजी पार्क आता यापुढेही विविध खेळातील आणखी गुणवंत घडवण्यास नव्या अंदाजात सज्ज होत आहे. 

 

Read More