Marathi News> मुंबई
Advertisement

Exclusive : महायुतीला 'बिनशर्त' पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंवर आदित्य ठाकरेंचा घणाघात; म्हणाले, भाजपला...

Loksabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड ठरली ती म्हणजे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महायुतीला मिळालेला बिनशर्त पाठिंबा.   

Exclusive : महायुतीला 'बिनशर्त' पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंवर आदित्य ठाकरेंचा घणाघात; म्हणाले, भाजपला...

Loksabha Election 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणाला (Maharashtra Politics) गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यानं काही नवी वळणं मिळाली आहेत. सत्तांतराच्या सत्रातून राज्य सावरत नाही, तोच इथं सत्तास्थापनेसाठीची समीकरणंही डोकं चक्रावणारी आहेत. जिथं कधी एकेकाळी विरोधी बाकावर बसणारी मंडळी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करत होती, त्यांपैकीच काही नावं आज सत्ताधाऱ्यांची हातमिळवणी करत सत्तेत सहभागी झाली आहेत. अशा या सत्तासमीकरणासंदर्भात (Shivsena Thackeray Group) शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीनं आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी अतिशय महत्त्वाची आणि थेट प्रतिक्रिया दिली आहे. 

कैक वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना पक्षातून वेगळं होत (Raj Thackeray) राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्या क्षणापासून शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. याच राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीआधी अनेक राजकीय चर्चा आणि घडामोडींनंतर आपल्या पक्षाचा महायुतीला बिनशर्त पाठींबा असल्याचं जाहीर करत ते महायुतीच्या प्रचारासाठी सक्रीयसुद्धा झाले. त्यांच्या या 'बिनशर्त' भूमिकेवर आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला. 

हेसुद्धा वाचा : पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पवारांच्या विधानाने खळबळ; म्हणाले, 'काँग्रेस आणि आमच्या..'

 

झी 24तासच्या 'टू द पॉईंट' (To the point) या मुलाखतीदरम्यान आदित्य यांनी राज ठाकरे यांच्यावर प्रहार केला. 'मुंबईत मराठी माणसाला विरोध करणाऱ्या गुजरातींना मनसेचा बिनशर्त पाठिंबा आहे का?' असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. इतक्यावरच न थांबता उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्या मनसेचा पाठिंबा भाजपला चालतो का? या प्रश्नाचा मारा करत त्यांनी मनसेच्या या पाठिब्यासंदर्भात नाराजीचा सूर आळवला. 

Read More