Marathi News> मुंबई
Advertisement

उद्यापासून राज्यात प्लास्टिक बंदी

हातात प्लास्टिक पिशवी दिसल्यास होणार दंडात्मक कारवाई

उद्यापासून राज्यात प्लास्टिक बंदी

मुंबई : उद्यापासून प्लास्टिक बंदी होणारच आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी ही घोषणा केली आहे. प्लास्टिक बंदीबाबत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे उद्यापासून प्लास्टिकचा वापर केला तर दंडात्मक कारवाईला सामोरं जावं जागणार आहे. तसंच 'दंडात्मक कारवाईत कुठेही शिथिलता येणार नाही असंही यावेळी पर्यावरण मंत्र्यांनी जाहीर केलं आहे.

प्लास्टिक बंदीबाबत उत्पादक, वितरकांना हायकोर्टातून कोणताही दिलासा मिळालला नाही. म्हणजे उद्यापासून प्लास्टिक बंदीचा कायदा लागू होणार आहे. प्लास्टिक उत्पादक, वितरकांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी ३ आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे. २० जुलैला पुढील सुनावणी होणार आहे.

Read More