Marathi News> मुंबई
Advertisement

आकाश अंबानी- श्लोका मेहताच्या साखरपुडा आणि लग्नाची तारीख ठरली

भारतातले सगळ्यात मोठे उद्योगपती मुकेश अंबानींचा मुलगा आकाश अंबानींच्या लग्नाची तारीख जवळपास निश्चित झाली आहे.

आकाश अंबानी- श्लोका मेहताच्या साखरपुडा आणि लग्नाची तारीख ठरली

मुंबई : भारतातले सगळ्यात मोठे उद्योगपती मुकेश अंबानींचा मुलगा आकाश अंबानींच्या लग्नाची तारीख जवळपास निश्चित झाली आहे. रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहतासोबत आकाश अंबानीचं लग्न डिसेंबर महिन्यात होणार आहे. गोव्यामध्ये झालेल्या प्री-एंगेजमेंट सेरिमनीनंतर यावर्षाच्या शेवटी दोघांचं लग्न होईल, असं बोललं जात होतं. आकाश आणि श्लोकाचा साखरपुडा २८-३० जूनला होणार आहे. मुकेश अंबानींचं घर एंटिलियामध्ये हा सोहळा पार पडेल. या दोघांच्या साखरपुड्याच्या पत्रिका पाठवायला आता सुरुवात झाली आहे. पहिले ऑनलाईन आणि मग वैयक्तिकरित्या भेटून साखरपुड्याचं आमंत्रण देण्यात येत आहे.

अशी आहे निमंत्रण पत्रिका

एका मिनिटाच्या क्लिपमध्ये पारंपारिक संगीताचा वापर करून ऑनलाईन निमंत्रण पत्रिका पाठवण्यात येत आहे. टेक्नोलॉजीचा वापर करून डिजीटल पत्रिका पाठवण्यात येत असली तरी पारंपारिक पद्धतीनं वैयक्तिकरित्याही पत्रिका देण्यात येत आहे.

डिसेंबरमध्ये होणार लग्न

आकाश आणि श्लोकाचं लग्न डिसेंबर महिन्यात होणार आहे. हे लग्न भारतीय परंपरेला अनुसरून असेल. मुंबईत होणाऱ्या या लग्नाची तयारी अंबानी कुटुंबियांनी सुरू केली आहे. याआधी गोव्याच्या एका रिसॉर्टमध्ये आकाश आणि श्लोकाची प्री-एंगेजमेंट सेरिमनी झाली होती. या सोहळ्यामध्ये आकाशनं श्लोकाला प्रपोज करून हिऱ्याची अंगठी घातली होती. 

fallbacks

Read More